दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:52 AM2018-06-12T06:52:27+5:302018-06-12T06:52:27+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

 The Class-XII supplementary examination will be held from July 17 | दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

Next

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ९ ते १६ जुलै या कालावधीत प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे, असे निवेदन राज्य मंडळाने दिले आहे.
दहावी-बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. पूर्वी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जायची. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. दहावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे.

गुणपत्रिका वाटप २२ जूनला
दहावीचा आॅनलाइन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना २२ जून रोजी दुपारी ३ वाजता मूळ गुणपत्रिका व कलचाचणी अहवालाचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title:  The Class-XII supplementary examination will be held from July 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.