सौरऊर्जा अन् इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात चिनी गुंतवणूक!

By admin | Published: November 17, 2016 03:46 AM2016-11-17T03:46:14+5:302016-11-17T03:42:36+5:30

चीनमधील सौरऊर्जा क्षेत्रातील लिनो ग्रुप कंपनीने राज्यात सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे.

Chinese investment in solar energy and electronic sector! | सौरऊर्जा अन् इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात चिनी गुंतवणूक!

सौरऊर्जा अन् इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात चिनी गुंतवणूक!

Next

मुंबई : चीनमधील सौरऊर्जा क्षेत्रातील लिनो ग्रुप कंपनीने राज्यात सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे. यासंदर्भात कंपनीच्या शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेतली.
सौरऊर्जा निर्मिती व सौरऊर्जा निर्मिती उत्पादने बनविणारी लिनो ही चीनमधील मोठी कंपनी आहे. महाराष्ट्रात ही कंपनी सौरऊर्जा निर्मितीबरोबर यासाठी लागणाऱ्या उपकरणांचीही निर्मिती करणार आहे. यासाठी या कंपनीस सुमारे तीन हजार हेक्टर जागा हवी आहे. कंपनीने सुपे किंवा खेड येथे उद्योग उभारणीसाठी जागा द्यावी, अशी मागणी देसाई यांच्याकडे केली. देसाई म्हणाले की, चीनच्या कंपनीचे स्वागत असून प्रकल्पासाठी जमीन, ऊर्जा व पाणी यांची सुविधा देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. कंपनीने जागेची पाहणी करून त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा. कंपनीस प्रकल्पासाठीच्या परवानग्या उद्योग विभाग व इतर विभागाकडून मिळण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Chinese investment in solar energy and electronic sector!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.