सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:24 AM2018-06-01T06:24:12+5:302018-06-01T06:24:12+5:30

विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स

Chief Minister Devendra Fadnavis will announce the increase in the use of electric vehicles for public transport | सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next

मुंबई : विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व ईईएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार केले. आगामी काळात सरकारी तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेइकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. राज्य सरकारने ई व्हेइकल धोरणाच्या अनुषंगाने आज शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर, चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार केले. महिंद्रा समूह व उद्योग विभागातील करारानुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात विजेवर चालणाºया गाड्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी सरकारला सहकार्य करणार आहे. तर, टाटा मोटर्स राज्य सरकारला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविणार असून, ई व्हेइकलसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला विजेवर चालणाºया कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. राज्यात विजेवरील वाहनांच्या वापर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण विभाग ईईएसएलला निधी पुरविणार असून, त्याबाबतच्या सामंजस्य करारावरही सह्या झाल्या.
पर्यावरणपूरक सुलभ, दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी प्रदूषणमुक्त अशा विजेवर चालणाºया वाहनांच्या वापराचे धोरण तयार केले आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण केलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गेटवे आॅफ इंडिया येथे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक कारमधून परिसरात फेरफटका मारला.

मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला विजेवर चालणाºया बसमधून मंत्रालय ते गेटवे प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी विजेवर चालणाºया बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेटवे आॅफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. या वेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ - पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनीही या बसमधून प्रवास केला.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis will announce the increase in the use of electric vehicles for public transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.