चिदंबरम खोटारडे - सुब्रमण्यम स्वामींची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:48 PM2017-07-24T16:48:43+5:302017-07-24T16:48:43+5:30

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी चिदंबरम खोटारडे असल्याची टीका केली.

Chidambaram Khotarde - Subramaniam Swamiji's criticism | चिदंबरम खोटारडे - सुब्रमण्यम स्वामींची टीका

चिदंबरम खोटारडे - सुब्रमण्यम स्वामींची टीका

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 24 - सरकारने आणलेला ‘जीएसटी’ कररूपी दहशतवाद असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी चिदंबरम खोटारडे असल्याची टीका केली. ते लवकरच तुरूंगात जाणार असल्याने काहीही वक्तव्य करीत आहेत, असे डॉ. स्वामी म्हणाले.
पुण्यात रविवारी पी. चिदंबरम यांनी ‘जीएसटी’च्या मुद्यावर सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला अपेक्षित असलेल्या जीएसटीमध्ये आणि सरकारच्या जीएसटीमध्ये मोठी तफावत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या डॉ. स्वामी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘संसदेच्या दोन्ही सभागृहात शंभर टक्के मतदान होऊन जीएसटीला मान्यता मिळाली आहे. आतापर्यंतच्या संसदीय इतिहास असे कधीही घडले नव्हते. जर जीएसटीला विरोध होता तर राज्यसभेत तो रोखून धरता आला असता. त्यांनी का अडविले नाही? पी. चिंदबरम यांच्या काळातच जीएसटी पुढे आला. ते खोटारडे आहेत. लवकरच तुरुंगात जाणार असल्याने काहीही वक्तव्य करीत आहेत.’
गोरक्षकांकडून होत असलेल्या हिसेंच्या मुद्यावर बोलताना डॉ. स्वामी यांनी त्यामध्ये भाजपाचे लोक नसल्याचे स्पष्ट केले. केरळमध्ये दररोज आरएसएसच्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. ‘सीपीएम’वाले त्यानंतर पार्टी करून आम्हीच हे केल्याचे सांगतात. पण त्यावर कोणीच काही बोलत नाही. मुझफ्फरनगरमध्ये हिंसा झाल्यानंतर त्यावेळी सत्ताधारी असलेल्या समाजवादी पक्षाविरोधात कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. आज आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र असे प्रश्न विचारले जात आहेत, असे डॉ. स्वामी यांनी नमुद केले. 
केरळमध्ये एका लेखकाला मुस्लिम धर्म स्वीकारण्याबाबत आलेल्या धमकीवर बोलताना डॉ. स्वामी म्हणाले, संबंधित मुस्लिम संघटनेने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. मी या संघटनेला चार दिवसांची मुदत देतो. त्यांनी ही धमकी मागे न घेतल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक केली जाईल.

Web Title: Chidambaram Khotarde - Subramaniam Swamiji's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.