पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:32 PM2017-08-27T17:32:17+5:302017-08-27T17:32:30+5:30

पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे आज (रविवार) सकाळी ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

Chandrasekhar Borhade, founder of 'Ranjai' environmentalist founder and former member of Pune Nodal Tree Promotion Committee | पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे निधन

पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे निधन

Next

पुणे, दि. 27 - पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे आज (रविवार) सकाळी ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

पुण्यातील पर्यावरणवादी क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून ते ख्यातनाम होते. शहर वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी, ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक प्रकल्प, मुठा नदी सुधारणा इत्यादी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. राज्य शासनाने 'दलितमित्र पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव केला होता. पुणे जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धन समितीसह विविध शासकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. त्यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Chandrasekhar Borhade, founder of 'Ranjai' environmentalist founder and former member of Pune Nodal Tree Promotion Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.