कॅसलर्स 200 वर्षांची परंपरा

By admin | Published: August 29, 2015 11:55 PM2015-08-29T23:55:39+5:302015-08-29T23:55:39+5:30

स्पेनमध्ये ह्युमन टॉवर स्पर्धेचे जनक म्हणून ओरोस रशेल यांचे नाव घेतले जाते. ८७ वर्षीय रशेल यांनी १९४०मध्ये स्पेनमध्ये ह्युमन टॉवर्सची परंपरा रुजवली, तर १९४८ मध्ये ‘कॅसलर्स’

Castellers 200 Years Tradition | कॅसलर्स 200 वर्षांची परंपरा

कॅसलर्स 200 वर्षांची परंपरा

Next

स्पेनमध्ये ह्युमन टॉवर स्पर्धेचे जनक म्हणून ओरोस रशेल यांचे नाव घेतले जाते. ८७ वर्षीय रशेल यांनी १९४०मध्ये स्पेनमध्ये ह्युमन टॉवर्सची परंपरा रुजवली, तर १९४८ मध्ये ‘कॅसलर्स’च्या रूपाने पहिली टीम तयार केली. स्पेनचे कॅसलर्स मानवी मनोऱ्यांचे आठ-नऊ थर लीलया उभारताना दिसतात. त्यांची शिस्त आणि अ‍ॅथलेटिक चापल्य यांची गोविंदांशी तुलना करणे गैर आहे. कारण दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथके अनेकदा थर रचतात. मात्र कॅसलर्स स्पर्धेच्या दिवशी एकदाच मानवी मनोरे रचतात.

कॅसलर्स हे व्यावसायिक क्रीडापटू आहेत. स्पेनमध्ये कॅसलिंग किंवा मानवी मनोरा उभारणे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. या कॅसलर्समध्ये १० वर्षांच्या मुलीपासून ते साठीच्या आजी-आजोबांपर्यंत खेळाडू असतात. त्यांच्या टीममध्ये मुले व मुली एकत्रितपणे थर रचतात. स्पेनमध्ये मानवी मनोरे रचणारे जवळपास
६०-६५ संघ आहेत.

काही संघांना ५० ते ६० वर्षांची परंपरा आहे. नव्याने स्थापन झालेल्या संघांमध्ये तरुण मुलामुलींचा अधिक भरणा असतो. स्पेनमध्ये प्रत्येक शहराचा एक संघ असतो. चिलीमध्येही मानवी मनोरे रचणारा एक संघ आहे. त्याशिवाय विद्यापीठ, महाविद्यालयांचेही काही वेळा वेगळे संघ असतात. सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सराव केला जातो आणि सुटीच्या दिवशी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. वर्षभर मानवी मनोरे रचण्याचे विविध कार्यक्रमही दुसऱ्या बाजूला सुरू असतात. या स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी अमेरिका, युरोपमधून मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहतात.

स्पेनच्या संघांमध्ये मुले-मुली एकत्र असतात. अनेक संघांत एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असतो. प्रत्येक संघाचा ड्रेसकोड वेगळा असतो. ड्रेसवर असणारा वैशिष्ट्यपूर्ण बॅच ही त्या संघाची ओळख असते. स्पेनमध्ये मोठ्या संघांचे स्वत:चे स्वतंत्र क्लब सुरू असून, त्याद्वारे वर्षभर कसून सराव केला जातो. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक थरातील खेळाडूंना वेगळे प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय संघातील प्रत्येक खेळाडूचे मत घेऊन दरवर्षी प्रशिक्षक पद वेगवेगळ््या व्यक्तीकडे सोपविले जाते. स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होतात, पद्धतशीरपणे थर कोण रचतात, शिस्त कोणत्या संघाद्वारे पाळली जाते, अशा निकषांवरून विजेत्यांची निवड केली जाते.

Web Title: Castellers 200 Years Tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.