पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:49 AM2019-06-22T03:49:26+5:302019-06-22T03:49:41+5:30

पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबत खूप मागे

The capital of tourism is Navaala; Aurangabad's Peshawar | पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी २७ मार्च २०१५ रोजी औरंगाबादलापर्यटन राजधानीचा दर्जा देऊन पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले खरे, मात्र आजही हे शहर पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबतची वानवा यांच्याशी झुंज देत असून, पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता औरंगाबाद एक परिपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या सुविधांची वानवा जाणवत असून, बहुसंख्य पर्यटक येथे राहणे पसंत करीत नाहीत. जोपर्यंत पर्यटक येथे रमणार नाहीत तोपर्यंत पर्यटनावर आधारित इतर उद्योग येथे बहरणार नाहीत. म्हणूनच केवळ पर्यटन राजधानी म्हणून विकास करण्यापेक्षा पर्यटन केंद्र म्हणून शहर आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास होण्यासाठी शहरात एमआयडीसी, डीएमआयसी यासारखी औद्योगिक क्षेत्रे उभी राहिली. याच धर्तीवर पर्यटन केंद्र किंवा राजधानी म्हणून शहराचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

देश-विदेशातील पर्यटकांना अजिंठा-वेरूळ लेण्यांसह शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळांचे देखील आकर्षण आहे; परंतु या वास्तू किंवा स्थळांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. यामुळे बहुतांश पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी आणि मकबरा पाहून निघून जातात. आता तर मनपातर्फे रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रालाही कायमचे टाळे लागले आहे, तसेच एमटीडीसीचे अधिकृत संकेतस्थळही विविध बदलांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कुचकामी ठरते.

सुविधांची वानवा
शहरात उत्तम दर्जाचे बाग-बगीचे, पर्यटकांच्या दृष्टीने निर्माण झालेली बाजारपेठ, बालकांसाठी करमणुकीची ठिकाणे, कला दालने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित होणारे आयोजन, शहरातील पर्यटन स्थळांना एका शृंखलेत जोडणारी बसव्यवस्था, तसेच दिवसभर पर्यटन करून परतल्यावर वेळ घालविण्यासाठी एखादे रम्य ठिकाण या सुविधा कोणत्याही पर्यटकांना हव्या असतात. त्यामुळे या सुविधा तर शहरात निर्माण कराव्यातच; पण यासोबतच या सर्व सोयीसुविधांची बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये योग्य प्रमाणात प्रसिद्धी होऊन तेथील पर्यटक कसे शहरात येतील, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Web Title: The capital of tourism is Navaala; Aurangabad's Peshawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.