नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धामिर्क स्थळे महापालिकेतर्फ़े हटविन्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी असलेल्या मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाण्यासमोरील दर्गा, रेडक्रॉसजवळील चामुंडा माता मंदिरासमोरील झाडाजवळील मुर्त्या काढण्यात आल्या. सद्यस्थितीत घनकर लेन येथील साई बाबा मंदिर काढण्यासाठी ताफा रवाना झाला आहे. महापालिका कर्मचारी तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.