योग्य जीवनशैलीमुळे वाढते ‘ब्रेन पॉवर’

By admin | Published: July 22, 2014 12:59 AM2014-07-22T00:59:21+5:302014-07-22T01:21:44+5:30

मेंदू हे माणसाला पडलेलं सर्वात मोठं कोडं आहे आणि या कोड्याचं उत्तर पुन्हा मेंदूतच दडलं आहे. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो, परंतु हा अवयव अद्यापही दुर्लक्षित आहे.

'Brain Power' increases due to the right lifestyle | योग्य जीवनशैलीमुळे वाढते ‘ब्रेन पॉवर’

योग्य जीवनशैलीमुळे वाढते ‘ब्रेन पॉवर’

Next

सुमेध वाघमारे- नागपूर
मेंदू हे माणसाला पडलेलं सर्वात मोठं कोडं आहे आणि या कोड्याचं उत्तर पुन्हा मेंदूतच दडलं आहे. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो, परंतु हा अवयव अद्यापही दुर्लक्षित आहे. योग्य जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये बदल केला तर स्मरणशक्ती वाढू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चुकीचा आहार शरीरासोबतच मेंदूला संकटात लोटत असतो. एका संशोधनातून असे आढळले की, आहारात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पदार्थ जास्त असले तर त्याचा दुष्परिणाम होतो. परंतु शालेय मुलांच्या डब्यापासून शाळांच्या कॅन्टिनपर्यंत अशाच पदार्थांचा ताबा वाढल्याने त्याचे घातक परिणाम दिसूनही येऊ लागले आहे. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात घ्यायला हवा. असे पदार्थ टाळायला हवेत. मेंदूला तरतरीत ठेण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मेंदूला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते. यामुळे लहानपणापासूनच समतोल आहाराची सवय अंगी बाणल्यास याचा फायदा होतो. सकाळी काही न खातापिता बाहेर पडल्याने रक्तातली साखर कमी होते. चक्कर येते. एकाग्रतेवर परिणाम होतो. नाश्त्यामध्ये तृणधान्ये, दूध, फळं असवीत पण कॅलरीजचं प्रमाण जास्त असू नये. मासे खाण्याने आपल्याला ओमेगा तीन फॅटी अ‍ॅसिड्स मिळतात. याला जवस किंवा अक्र ोड हा शाकाहारी पर्याय असू शकतो. वृद्धापकाळात स्मृतिक्षय, अल्झायमर्स यांसारखे आजार होऊ नयेत म्हणून जवसाचे तेल, फिश आॅईल, अक्र ोड यांचा आहारात समावेश केल्याची त्याची तीव्रता कमी होते.
मेंदूसाठी खेळ-व्यायाम आवश्यकच
खेळ-व्यायामासाठी वयाचे बंधन नसते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. ही शरीराच्या इतर अवयवासोबतच मेंदूसाठीही घातकच आहे. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. मुलं जेवढी खेळतील तसा कॉर्पस कलोझम सक्षम होतो. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल- व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. पेशींना योग्य प्रमाणात आॅक्सिजन मिळतो.

Web Title: 'Brain Power' increases due to the right lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.