'पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 05:51 AM2018-07-16T05:51:39+5:302018-07-16T05:51:58+5:30

विरोधक कितीही एकवटले तरी ते भाजपाला हरवू शकत नाही. आज विरोधात असणारे तेव्हाही विरोधात होतेच.

'BJP's power for next 20 years' | 'पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता'

'पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता'

Next

नागपूर : विरोधक कितीही एकवटले तरी ते भाजपाला हरवू शकत नाही. आज विरोधात असणारे तेव्हाही विरोधात होतेच. उद्या मुलायम सिंह यादवांनी येथे येऊन प्रचार केला तरी आपल्याला काय फरक पडतो. त्यामुळे घाबरू नका. भाजपाचा विजयरथ रोखणे कठीण आहे. पुढील १५-२० वर्षे भाजपाचीच सत्ता येणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
भाजपाची पूर्व विदर्भातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक कोराडी येथे झाली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह बहुतांश आमदार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, गेल्यावेळी लोकसभेत २८५ जागांवर निवडून आलो. १७ कोटी मतदान झाले. चार वर्षांत केंद्र व राज्य सरकारने ४० कोटी लोकांना योजनांचा लाभ दिला आहे. त्यातील २० कोटींनी मतदान केले तरी बहुमत मिळेल.
>शिवसेनेचा उल्लेख टाळला
शिवसेना सातत्याने भाजपावर हल्लाबोल करीत आहे. सभागृहातही भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. बैठकीत शिवसेनेबद्दल काही दिशानिर्देश मिळतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात फडणवीस व दानवे यांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.

Web Title: 'BJP's power for next 20 years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.