भाजपा मनसेला 'झीरो' करणार ?

By admin | Published: October 21, 2014 10:24 AM2014-10-21T10:24:00+5:302014-10-21T14:08:13+5:30

मनसेचा एकमेव आमदारही गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाला यात यश आल्यास गेल्या निवडणुकीत १३ आमदारांमुळे हिरो बनलेल्या मनसे यंदा 'झीरो' होणार हे नक्की.

BJP will make MNS 'Zero'? | भाजपा मनसेला 'झीरो' करणार ?

भाजपा मनसेला 'झीरो' करणार ?

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २१ - विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्य पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात आली असतानाच आता मनसेचा एकमेव आमदारही गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.  भाजपाला यात यश आल्यास गेल्या निवडणुकीत १३ आमदारांमुळे हिरो बनलेल्या मनसे यंदा 'झीरो' होणार असेल असे दिसते. 
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा फक्त जुन्नरमधील जागेवरच विजय मिळाला आहे. जुन्नरमधील मनसे आमदार शरद सोनवणे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. सोनवणे यांना मनसेसोडून भाजपमध्ये येण्याचे निमंत्रणही दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
याविषयी सोनवणे म्हणाले, माझा पाठिंबा मिळावा, यासाठी काल रात्री भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप व अन्य पदाधिकार्‍यांनी दूरध्वनी करून काल रात्रीच आपल्याशी संपर्क साधला.  गेल्या सहा महिन्यांपासून आपण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत काम करीत आहे. मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: BJP will make MNS 'Zero'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.