देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:07 PM2021-08-25T12:07:31+5:302021-08-25T12:13:12+5:30

अभिजीत फडणवीस यांच्या अचानक जाण्यानं फडणवीस कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

BJP Devendra Fadnavis' cousin Abhijeet Fadnavis dies of heart attack in Nagpur | देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

googlenewsNext

नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या काकी शोभा फडणवीस यांना पुत्रशोक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस(Abhijeet Fadnavis) यांचं बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.

शोभा फडणवीस(Shobha Fadnavis) या राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस यांना नागपूरातील राहत्या घरी ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तोवर अभिजीत फडणवीस यांची प्राणज्योत मालवली होती. अभिजीत फडणवीस यांच्या अचानक जाण्यानं फडणवीस कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेते उपस्थित असतील.

Web Title: BJP Devendra Fadnavis' cousin Abhijeet Fadnavis dies of heart attack in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.