मुसलमान असल्याने तरुणीला मुंबईत घर नाकारले

By admin | Published: May 27, 2015 11:27 AM2015-05-27T11:27:18+5:302015-05-27T13:36:52+5:30

मुसलमान असल्याने मिसबाह कादरी या तरुणीला मुंबईतील वडाळा येथील उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.

Being a Muslim, the girl refused to stay in Mumbai | मुसलमान असल्याने तरुणीला मुंबईत घर नाकारले

मुसलमान असल्याने तरुणीला मुंबईत घर नाकारले

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - मुसलमान असल्याने मिसबाह कादरी या तरुणीला मुंबईतील वडाळा येथील उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधीत बिल्डर व सोसायटीतील अन्य रहिवाशांवर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे. 

गुजरातमध्ये जन्मलेली मिसबाह कादरी ही तरुणी उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईत आली. कम्युनिकेशन प्रॉफेशनल म्हणून कार्यरत असलेल्या मिसबाह कादरीने मुंबईत घराचा शोध सुरु केला. मुस्लीम असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये तिला घर नाकारण्यात आले. अखेर वडाळ्यातील संघवी सोसायटीमध्ये तिला घर मिळाले. या घरात दोन मुली भाड्याने राहत असून त्या हिंदू आहेत. या घराविषयीची माहिती तिला एका इस्टेट एजंटकडून मिळाली होती. घरात राहायला जाण्यापूर्वी त्या एजंटने मिसबाहला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सांगितले. या इमारतीमध्ये मुसलमानांना घर दिले जात नाही. तुम्ही मुस्लीम महिलांप्रमाणे बुरखा घालून बाहेर पडू नका अशी तंबीही तिला देण्यात आली. तसेच मुसलमान असल्याने काही त्रास झाल्यास याला बिल्डर, एजंट व रहिवाशी जबाबदार नाही असे तिला लेखी लिहून द्यायला सांगितले गेले. घराची आवश्यकता असल्याने मिसबाहनेदेखील लेखी पत्र दिले व वडाळ्यातील घरात राहायला आली. घरातील अन्य दोन तरुणींनी मिसबाहला चांगले सहकार्य केले होते.  

सर्व सुरळीत सुरु असताना आठवडाभरानंतर त्या एजंटने पुन्हा मिसबाहशी संपर्क साधला व तिला घर खाली करण्याची धमकी दिली. घर खाली न केल्यास पोलिसांना बोलवून तुझे सामान रस्त्यावर फेकून देऊ अशी धमकी मला त्या एजंटने दिल्याचे मिसबाह सांगते. या घटनेनंतर मिसबाहने वडाळ्यातील घर खाली केले असून याविरोधात तिने महिला आयोग व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे. 

Web Title: Being a Muslim, the girl refused to stay in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.