बाप्पाही रमले खेळात!

By admin | Published: August 27, 2014 12:56 PM2014-08-27T12:56:55+5:302014-08-27T13:00:00+5:30

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलाकारांना लाडक्या 'श्री'ला घडविण्याचे भाग्य मिळते. पण हाच लाडक्या गणराया खेळाडूच्या रूपात दिसला तर..

Bappa ramale sport! | बाप्पाही रमले खेळात!

बाप्पाही रमले खेळात!

Next
>'गणेश खेळ उत्सव' संकल्पनेचे आयोजन : निर्मिती आर्ट संस्थेचा वक्रतुंड मेळावा
 
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलाकारांना लाडक्या 'श्री'ला घडविण्याचे भाग्य मिळते. पण हाच लाडक्या गणराया खेळाडूच्या रूपात दिसला तर.. गणपतीची हीच लोभसवाणी रूपे प्रभादेवी येथील निर्मिती आर्ट संस्थेच्या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. हा 'वक्रतुंड मेळावा' ३0 ऑगस्टपर्यंत खुला आहे.
खेळाडूच्या रूपातील गणेश हा अविरत मेहनत, खिलाडू वृत्ती, दूरदृष्टी, प्रसंगावधान आदी विविध गुणांचे प्रतीक बनतो. अशाच विविध प्रांतांतील कलाकारांनी घडविलेल्या 'श्रीं'च्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध रूपातील आणि विविध वस्तूंपासून तयार केलेले गणपती या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे. 'गणेश खेळ उत्सव' ही या मेळाव्याची यंदाची संकल्पना आहे.
 
सजावटीसाठी किंवा भेटवस्तू म्हणून मूर्तींना पसंती 
 
> तेराकोट्टापासून तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या विविध खेळ खेळतानाच्या छोट्या गणेशमूर्ती अतिशय लोभस आहेत. या मूर्ती लहानांपासून थोरांनाही आकर्षित करतात. पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीही येथे ठेवण्यात आल्या आहेत.
> यामध्ये क्रिकेट, अँथलेटिक्स, फुटबॉल, बास्केट बॉल, गोल्फ, कॅरम, टेबल टेनिस अशा विविध क्रीडाप्रकारात मग्न गणेशमूर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी किंवा भेटवस्तू म्हणून या मूर्तींना पसंती आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कागदाच्या लगद्याच्या असल्या तरी अगदी तांब्या किंवा पितळेच्या धातूपासून तयार केल्यासारख्या वाटतात.
> कडुलिंबाचे लाकूड, सिरॅमिक, नारळाची किशी आदी गोष्टींपासूनही गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी नारळावर साकारलेल्या गणेशमूर्तीला विशेष पसंती आहे. विविध वाद्य वाजवणारे गणपतीही येथे पाहायला मिळतात.
(प्रतिनिधी) 
 

Web Title: Bappa ramale sport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.