मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या मालमतांचा पुन्हा एकदा मंगळवारी (दि. १४) जाहीर लिलाव होणार आहे. त्याला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
१९९३च्या बॉम्बस्फोटांनंतर केंद्राने दाऊदच्या देशभरातील विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. लिलावाद्वारे त्यांची विक्री केली जात असली तरी दाऊदच्या दहशतीमुळे त्या खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नसल्याचे यापूर्वी दिसले आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल. त्यामध्ये याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाउस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील ५ घरे व हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे. हॉटेलची मूळ किंमत १ कोटी १५ लाख आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी अफरोज हॉटेलवर बोली लावणार आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.