दूधकोंडीचा फास आवळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:46 AM2018-07-18T05:46:43+5:302018-07-18T05:46:53+5:30

दूध आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दूध फेकून दिले. पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना ताब्यात घेतले.

Attempts to fend off the scalp of milk | दूधकोंडीचा फास आवळण्याचा प्रयत्न

दूधकोंडीचा फास आवळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

पुणे/कोल्हापूर : दूध आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दूध फेकून दिले. पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना ताब्यात घेतले.
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाकडे (कात्रज दूध) दूध संकलन होऊ नये, याची काळजी कार्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे कात्रजचे दूध संकलन मंगळवारी निम्म्याने घटले. राज्यातील विविध खासगी डेअऱ्यांमध्येदेखील निम्मेही संकलन होऊ शकले नाही.
दूधसंघांशी चर्चा करणार
नागपूरमध्ये मंगळवारच्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्यासह दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यातील प्रमुख दूधसंघ प्रतिनिधी, सहकारी दूधसंघ प्रतिनिधी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी, असेही ठरले आहे. ते गुरुवारी येतील. त्यावर पुन्हा चर्चा होऊन निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांच्या दूधासाठी रेल्वे सज्ज !
मुंबई : राज्यात सुरु असलेली दूधकोंडी फोडण्यासाठी सरकारने रेल्वेमार्फत गुजरात येथील दूध मुंबईला आणण्याच्या सूचना केल्या होत्या. यानूसार अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरच्या एका फेरीत तब्बल ८८ हजार लिटर दूध मुंबईत दाखल झालें़ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम रेल्वेला गुजरात येथील दूध मुंबईत नेण्याबाबत सूचना केली.

Web Title: Attempts to fend off the scalp of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध