दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 06:06 PM2018-08-16T18:06:46+5:302018-08-16T18:32:31+5:30

२ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही.

Atalji's rally crowd record still remains for present | दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

Next
ठळक मुद्देअटलजींनी केली होती शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाएकंदरीतच गर्दी पाहता यावेळी २0 स्पिकर

दौैंड : दौैंड शहरातील महात्मा गांधी चौैकात झालेल्या २ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही. गांधी चौैकात अटलजींचे विचार ऐकण्यासाठी दौैंड, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, येथून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. एकंदरीतच गर्दी पाहता यावेळी २0 स्पिकर लावण्यात आले होते. या सभेच्या संदर्भात तत्कालीन भाजपाचे शहराध्यक्ष प्रकाशजी बोगावत, भाजपाचे जिल्हा सचिव मोहनलालजी भंडारी यांनी माहिती देताना सांगितले की, दौैंड तालुक्याचे आमदार राजारामबापू ताकवणे आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने ही सभा झाली होती की जेणेकरुन भारतीय जनता पार्टीच्या सदस्य संख्येत वाढ व्हावी म्हणून. यावेळेला दौैंड तालुका भाजपाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना पाच लाख रुपयांचा निधी पक्ष विकासाठी देण्यात आला होता. व्यासपीठावर येण्यापूर्वी अटलजी जुन्या रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ आले. त्यावेळेस त्यांची नजर कुरकुंभ मोरीजवळ असलेल्या उंच पादचारी पूलावर गेली. त्यांच्या या दृष्टीचा संदर्भ घेत ते ४५ मिनिटांच्या जाहीर भाषणात म्हणाले होती की, रेल्वे मोठ्या प्रमाणावर खर्च करते मात्र कुठल्याही गोष्टीचे नियोजन नसते. मोठ्या प्रमाणावर लोखंडी पायऱ्या असलेल्या या पूलावरुन तरुणांची देखील दमछाक होईल तर वयोवृद्ध माणसांचे काय? असे सांगून शेतकरी, सर्वसामान्य माणूस यासह भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणे स्पष्ट केली होती.

....................

* शरद पवारांवर अप्रत्यक्ष टिका

दौंड येथील सभेत अटलजींनी शहराच्या विकासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता बारामती लोकसभा मतदार संघात दौंड तालुका येतो. तेव्हा या तालुक्याचा विकास का होत नाही अशी टीका देखील त्यांनी केली असल्याचे भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी सांगितले.

.....................

* आणि खलिस्तान चळवळ स्पष्ट केली १९८३ साली खलिस्तान चळवळ सुरु होती. या खलिस्तान चळवळीची आठवण देताना अटलजी म्हणाले की, ‘मारणेवालो को मालूम नही क्यो मार रहे है। और मरनेवालोको भी मालूम नही था की, क्यो मर रहे है।’ अशी गोंधळमय परिस्थिती त्यांनी दौंडच्या सभेत स्पष्ट केली असल्याचे तत्कालीन पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस मोहनलालजी भंडारी यांनी सांगितले.

..........................

* लोक भुके नही रहते दौंड येथील सभेत अटलजी यांनी काही विनोदी चुटके देखील सांगितले होते. ते म्हणाले होते की, ‘अचानक घरमें खाना खाने के लिय लोकं बढ गये, तो दाल ऐसी चिज हे, जिसमे कितना भी पाणी मिलावो लोक भुके नही रहते’ अशी आठवण तत्कालीन दौंड शहर भाजपाचे अध्यक्ष प्रकाशजी बोगावत यांनी सांगितली.

..........................

* जब्बार पटेल यांनी मुर्हताला वेळ मागितला

दौंड येथील सभा झाल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरायला अटलजी यांना तब्बल १ तास लागला होता. एवढा मोठा गराडा त्यांच्या भोवती होता. दरम्यान सभेनंतर पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळेला सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. त्यांना त्यांच्या ‘उबंरठा’ या चित्रपटाचा मुहूर्त अटलजींच्या हस्ते करावयाचा होता. याकामी पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुढे या चित्रपटाच्या मुहूर्ताचे काय झाले हे मात्र समजू शकले नाही.

 

Web Title: Atalji's rally crowd record still remains for present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.