अर्नाळ्यातील रस्त्यांचीही वाताहत

By admin | Published: August 2, 2016 03:29 AM2016-08-02T03:29:02+5:302016-08-02T03:29:02+5:30

अर्नाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता एसटीपाडा ते कचेरी रोड रस्त्याची पार दुरवस्था झाली

The Arrival of Arlah Roads | अर्नाळ्यातील रस्त्यांचीही वाताहत

अर्नाळ्यातील रस्त्यांचीही वाताहत

Next


विरार : अर्नाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता एसटीपाडा ते कचेरी रोड रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले असून वाहतूक करणे अशक्य होऊन बसले आहे.
समुद्रकिनारी असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे अर्नाळा ग्रामपंचायतीवर टीकेची झोड उठत असताना आता गावातील अनेक रस्त्यांची
दैनावस्था झाल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.
अर्नाळा एसटीपाडा ते कचेरी रोड अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहतूक करणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती केली जात नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)
>तर आंदोलन छेडणार
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख प्रथमेश बावकर यांनी दिला. यावेळी उपविभागप्रमुख देवेंद्र वैती, शाखाप्रमुख मदन सामंत (शा.क्र.१), शाखाप्रमुख अमित भोईर (शा.क्र.२), उपशाखाप्रमुख किशोर तांडेल उपस्थित होते.

Web Title: The Arrival of Arlah Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.