त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:18 AM2023-10-26T09:18:38+5:302023-10-26T09:24:39+5:30

मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला.

arrest manoj Jarange Patil; Gunratna Sadavarten's allegation of car vandalism, rejected by Jarange Patil maratha reservation politics begins | त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

सकाळी सहाच्या सुमारास मुंबईतील पऱळ भागातील वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांसमोरच हा प्रकार झाला. यावरून सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटलांच्या शांततामय आंदोलनाची हिच व्याख्या आहे का असा सवाल करत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. दुसरीकडे जरांगे पाटलांनी सदावर्तेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनलने हे दाखवलं. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचं ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेन. पाणी पिऊन किंवा सलाईन लावून उपोषण होत नाही, असे सदावर्ते म्हणाले. 

माझी हत्या जरी झाली तरी मी गुणवंतांसाठी लढा सुरूच ठेवणार आहे. महाराष्ट्रातील या घटनांची सुरुवात ही पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली. ती माझ्या घरावर आलीय. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले. त्या जरांगेंना अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. 

दुसरीकडे सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे.  या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. 

Web Title: arrest manoj Jarange Patil; Gunratna Sadavarten's allegation of car vandalism, rejected by Jarange Patil maratha reservation politics begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.