‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:30 AM2017-11-18T02:30:36+5:302017-11-18T02:30:45+5:30

‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली.

Appeal against 'Dishchariya' dismisses; The Brahmin Federation | ‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

Next

औरंगाबाद/कोल्हापूर/नाशिक/पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली. राज्यात ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध करत आंदोलन केले, मात्र पोलीस बंदोबस्तात चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला.
सर्जनशील व्यक्तीला नाटक, चित्रपट आदींच्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावरील लघुपटाच्या बंदीविरोधातील याचिकेवरील निर्णयात म्हटल्याचा संदर्भ देत, न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. बोलणे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे अटळ आहे. चित्रपट, नाटक, पुस्तक, लघुपट यावर बंदीच्या आदेशापूर्वी न्यायालयाने त्याबाबत साक्षेप बाळगावा. ज्यामुळे लेखक, कलाकार, निर्माते अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपू शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचा आधार घेत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
‘दशक्रिया’ चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा आक्षेप घेणारी आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी आदींची याचिका शुक्रवारी सुनावणीस आली होती.
मराठा महासंघाच्या पुढाकाराने प्रदर्शन
कोल्हापुरला अखिल भारतीय मराठा महासंघाने चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन चित्रपटाचे खेळ सुरू करायला लावले. चित्रपटाकडे प्रबोधनाचे माध्यम म्हणून बघावे, अशी भूमिका महासंघाने मांडली.
पुणे, नाशिकमध्ये आंदोलन
पुणे, नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध केला. ब्राम्हण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते.
पैठणमध्ये दशक्रिया विधीत अडथळे -
पैठणमध्ये शुक्रवारी मोक्षघाटावर विधी करण्यासाठी पुरोहित हजर राहिले नव्हते. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजातर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. दुपारी १२ नंतर विधी सुरू झाले. राज्यभर या चित्रपटाला विरोध झाला तरी काही ठिकाणी चित्रपट सुरळीत सुरू झाला़ तसेच चित्रपट परीक्षकांनी दर्जेदार सिनेमा असे कौतुक केले आहे़

Web Title: Appeal against 'Dishchariya' dismisses; The Brahmin Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.