रुग्णवाहिका, पोलिसांना रात्री सायरन वाजविण्यावर बंदी!

By Admin | Published: August 6, 2014 12:49 AM2014-08-06T00:49:34+5:302014-08-06T01:11:13+5:30

आवाजातून सुटका : आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या हद्दीबाहेर हॉर्नचा वापर

Ambulance, police banned sirens at night! | रुग्णवाहिका, पोलिसांना रात्री सायरन वाजविण्यावर बंदी!

रुग्णवाहिका, पोलिसांना रात्री सायरन वाजविण्यावर बंदी!

googlenewsNext

बुलडाणा : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलिस खात्यासह इतर शासकीय वाहनांना असलेले सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न रात्री १0 ते सकाळी ६ या वेळेमध्ये वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या वाहनांची ध्वनीर्मयादा तपासण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवरील हॉर्न काढण्याच्या सूचनाही शासनाने प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिल्या आहेत. रूग्णवाहिकांचे वाहनचालक अनेकवेळा हॉर्नचा दुरूपयोग करून शहरात वाहनं सुसाट दामटतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच, शिवाय अपघाताचा धोकाही वाढतो. पुण्यातील एका संस्थेने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शासनाने यासंदर्भात पाऊले उचलली. त्यानुसार रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आपत्ती निवारण वाहने, तसेच पोलिस खात्यासह इतर शासकीय वाहनांवर लावण्यात येणार्‍या सायरनसाठी शासनाकडून नियमावली निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या वाहनांनी निर्धारित ध्वनी र्मयादेतच त्याचा वापर करावा, पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी त्याची तपासणी करावी, या वाहनांनी ध्वनी र्मयादेचे उल्लंघन केल्यास वाहनांवरील सायरन काढून कारवाईदेखील करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ** आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या हद्दीबाहेर हॉर्नचा वापर शासन आदेशानुसार, सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या शासकीय वाहनांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये रात्री १0 ते सकाळी ६ या वेळेमध्ये हॉर्नचा वापर करू नये. आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या हद्दीबाहेरील रस्त्यांवर हॉर्नचा वापर करता येईल. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या अँम्बुलन्सवर लावण्यासाठी योग्य स्टीकर द्यावा. रूग्णांच्या नातेवाईकांकडून मागणी आल्याशिवाय रुग्णवाहिकांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.

Web Title: Ambulance, police banned sirens at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.