अंबानींच्या ‘अँटालिया हाऊस’ला आग

By admin | Published: July 11, 2017 05:37 AM2017-07-11T05:37:42+5:302017-07-11T05:37:42+5:30

दक्षिण मुंबईतील अँटालिया हाऊस’ या टोलेजंग टॉवरच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

Ambani's 'Antalya House' fire | अंबानींच्या ‘अँटालिया हाऊस’ला आग

अंबानींच्या ‘अँटालिया हाऊस’ला आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या दक्षिण मुंबईतील अँटालिया हाऊस’ या टोलेजंग टॉवरच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ साहित्य भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांचे गावदेवी येथील अल्ट्रामाऊंट रोडवर २७ मजली व ५७० फूट उंच अँटालिया हाऊस आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अँटालिया हाऊसच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागली. सुरक्षारक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवित अग्निरोधन यंत्राचा वापर केला. अग्निशमन दलाचे जवानही काही वेळेतच तेथे पोहचले. त्यांनी या टॉवरचा विद्युतपुरवठा बंद करून काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. इमारतीच्या ६व्या मजल्यावर गॅरेज असून येथे १६८ वाहनांच्या पार्किंगची क्षमता आहे. मात्र सर्वाधिक सुरक्षित व अद्यावत यंत्रणा असलेल्या या इमारतीला आग लागल्यामुळे काहीकाळ खळबळ उडाली.

Web Title: Ambani's 'Antalya House' fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.