तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:01 AM2017-09-21T01:01:01+5:302017-09-21T01:01:31+5:30

पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

After the mysterious disappearance of the young man, the suicide of the teenager, the incident happened in Ambooli, the blood vessel found in the car | तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा

तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा

Next

सावंतवाडी, दि. 20 - पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. हा तरुण मंगळवारी दुपारपासून आंबोली परिसरात संशयितरीत्या फिरत होता.

तसेच त्याने आपली कार आंबोलीपासून चार किलोमीटर अंतरावर उभी करून ठेवली होती. या कारमध्ये रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले असून, या तरुणासोबत आलेल्या मुलीचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. पंजाब पोलीस गेले चार दिवस या युवकाच्या मागावर असून, ते आंबोलीत दाखल झाले आहेत.

याबाबतची माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत यांनी दिली आहे. पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, सायंकाळी उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. पंजाब येथील चंदीगढ पोलीस आले असून, कारमध्ये रक्ताचे डाग व कोयती आढळले आहेत. पोलिसांनी कोयती जप्त केली आहे. मृत तरुणाचे नातेवाईक उद्यापर्यंत आंबोली येथे पोहोचणार आहेत. दरम्यान, सोबत आणलेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या केली की नाही, याबाबत अद्याप प्रश्नचिन्हचं आहे. त्यामुळे पोलीस त्या तरुणीचा शोध घेत आहेत. पंजाब पोलीस आंबोली पोलिसांच्या मदतीने आंबोलीपासून आजरापर्यंत सर्वत्र शोध घेत आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणाने हॉटेलच्या रूममध्ये साबणाने एक संदेश लिहून ठेवला आहे, यात त्याने मी चांगला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यानं लिहिलं आहे.    

Web Title: After the mysterious disappearance of the young man, the suicide of the teenager, the incident happened in Ambooli, the blood vessel found in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.