देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:04 PM2017-09-07T14:04:12+5:302017-09-07T14:07:42+5:30

पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला.

Above all in the country: Baba Adhav | देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे



आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला. देशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित आहेत. तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर येथे शेतकरी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी परिषदेसाठी ते आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी देशात, राज्यात सध्या सुरू असलेले विविध समाजाचे मोर्चे, शेतकºयांचा उद्रेक, कष्टकरी, असंघटित कामगारांचे विविध प्रश्न, शेतकºयांचा हमीभाव, कर्जमाफी या विषयी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.
प्रत्येक राज्यात सुरू असलेले आरक्षणासाठीचे मोर्चे, सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकºयांचा उद्रेक, असंघटित कामगारांच्या समस्या, देशात वाढत असलेली विषमता, दुष्काळसदृश परिस्थिती याशिवाय अनेक मूलभूत सुविधांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे, पण तसे न करता सरकार जाणीवपूर्वक मोर्चे मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे, असे बाबा आढाव म्हणाले.
---------------------
कणखर भूमिका घ्यावी
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र वेळोवेळी तडजोड, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यासह शेतकरी, कष्टकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या परराज्यातील लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते कणखर भूमिकेमुळे त्या राज्यांचे हित जोपासत आहेत. तशीच कणखर भूमिका शरद पवारांनी घेतल्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकरी, कष्टकºयांना निश्चित लाभ होईल, असे बाबा आढाव म्हणाले.

Web Title: Above all in the country: Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.