नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:20 AM2018-01-23T03:20:22+5:302018-01-23T03:20:32+5:30

द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील बागायतदारांना यंदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदा तब्बल ७०.७२ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे.

 71 million grape exports to Europe from Nashik | नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात

नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात

Next

नामदेव भोर 
नाशिक : द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील बागायतदारांना यंदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदा तब्बल ७०.७२ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. ६००हून अधिक कंटेनर युरोप आणि रशियात पोहोचले आहेत.
मागील वर्षीच्या द्राक्ष हंगामात इंग्लंड, युरोप आणि रशिया या तीन प्रमुख देशांसह अन्य देशांमध्ये १८२ कंटेनर निर्यात झाली होती. मागील वर्षी द्राक्षांचे उत्पादनही चांगले
होते.
मात्र द्राक्ष उशिराने युरोपात पोहोचले. त्याचवेळी त्यांचा आकारही लहान होता व साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चांगला भाव मिळाला नव्हता. यंदा मात्र पीक वेळेत व चांगले आल्याने तब्बल ८० हजार रुपये प्रति टन भाव मिळाला.
यासोबतच निर्यातही तीन पट वाढली. नाशिक जिल्ह्यात यंदा ४० ते ४५ हजार एकरवर जवळपास ३४ हजार भूखंडावर द्राक्षांच्या बागा फुलल्या आहेत.
यंदा बागायतदारांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक भाव मिळाल्याने दिलासा आहे. परंतु, नाशिकच्या द्राक्षांना जागतिक पातळीवर चिलीच्या द्राक्षांची स्पर्धा आहे. त्यामुळे उत्पादकांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
द्राक्षांची निर्यात अशी-
युरोप : ३२४० टन (२७० कंटेनर)
रशिया : ५६०० टन (३५० कंटेनर)
एकूण : ८८४० टन (६२० कंटेनर)
दर : प्रति टन ८० हजार रुपये
निर्यात : ७०.७२ कोटी रुपये

Web Title:  71 million grape exports to Europe from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक