६० शिक्षकांना नोटिसा; आयोगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:51 PM2018-07-05T23:51:04+5:302018-07-05T23:51:12+5:30

गृहभेटी देऊन मतदारांची व्यक्तिगत माहिती गोळा करण्याचे निवडणूक आयोगाने सोपविलेले काम करण्यास नकार देणाऱ्या ६० शिक्षकांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 60 notices to teachers; Action of commission | ६० शिक्षकांना नोटिसा; आयोगाची कारवाई

६० शिक्षकांना नोटिसा; आयोगाची कारवाई

Next

नाशिक : गृहभेटी देऊन मतदारांची व्यक्तिगत माहिती गोळा करण्याचे निवडणूक आयोगाने सोपविलेले काम करण्यास नकार देणाऱ्या ६० शिक्षकांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले असून, यात काही शासकीय कर्मचा-यांचाही समावेश आहे.
निवडणूक आयोगाने यादीत नाव असलेल्या मतदाराच्या घरी जाऊन त्याची वैयक्तिक माहिती आयोगाच्या विहित नमुन्यात अथवा अ‍ॅपवर भरण्याचे आदेश प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. जून महिन्यातच काम पूर्ण करणे बंधनकारक होते. नाशिक शहरात निवडणूक अधिकाºयांनी बीएलओला नियुक्तीचे आदेश व कामाच्या नोटिसा बजावून कामाची जाणीव करून दिली असतानाही त्याकडे बहुतांशी शिक्षकांनी दुर्लक्ष केले. यातील काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा आधार घेत निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला. आयोगाने काम न करणाºयांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक अधिकाºयांना दिल्या आहेत. त्यानुसार सुमारे ६० शिक्षकांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

लोकप्रतिनिधित्व कायद्याचा आधार
आयोगाने काम न करणाºयांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक अधिकाºयांना दिल्या आहेत. त्यानुसार सुमारे ६० शिक्षकांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title:  60 notices to teachers; Action of commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक