बीड-परळी-वैजनाथ रेल्वेसाठी ३३ कोटी मंजूर

By admin | Published: August 3, 2015 01:55 AM2015-08-03T01:55:40+5:302015-08-03T01:55:40+5:30

मराठवाड्यासाठी सर्वांत महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असलेल्या अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथसाठी राज्य शासनाकडून ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले

33 crores sanctioned for Beed-Parli-Vaijnath railway | बीड-परळी-वैजनाथ रेल्वेसाठी ३३ कोटी मंजूर

बीड-परळी-वैजनाथ रेल्वेसाठी ३३ कोटी मंजूर

Next

मुंबई : मराठवाड्यासाठी सर्वांत महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असलेल्या अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथसाठी राज्य शासनाकडून ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या नवीन रेल्वेमार्गाकरिता एकूण खर्च २ हजार ८२६ कोटी रुपये एवढा आहे. यात ५0 टक्के रक्कम राज्य शासन तर उर्वरित ५0 टक्के रक्कम रेल्वे मंत्रालय देणार आहे. राज्य शासनाकडून १ हजार ४१३ कोटी रुपये शासनाने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतला असून, मार्च २0१५मध्ये २0८ कोटी ७५ लाख रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे २0१५-१६मध्ये आणखी ४८ कोटी २ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद शासनाकडून करण्यात आली असून, ३३ कोटी रुपये इतका निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Web Title: 33 crores sanctioned for Beed-Parli-Vaijnath railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.