२०० टँकरद्वारे ३५ टंचाईग्रस्त गावांना पुरविले अडीच लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:48 AM2019-05-15T10:48:50+5:302019-05-15T10:50:50+5:30

बार्शी तालुक्याला जैन समाजाची मदत; महावीर जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

2.5 lakh liters water provided to 35 scarcity-hit villages through 200 tankers | २०० टँकरद्वारे ३५ टंचाईग्रस्त गावांना पुरविले अडीच लाख लिटर पाणी

२०० टँकरद्वारे ३५ टंचाईग्रस्त गावांना पुरविले अडीच लाख लिटर पाणी

Next
ठळक मुद्देकमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईबार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू

बार्शी  : बार्शीतील सकल जैन समाजाच्या वतीने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तहानलेल्या गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे मोफत पुरविण्यात येत असून, श्री भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून बार्शीतील श्री भगवान महावीर जन्मकल्याणक समितीच्या वतीने २५ एप्रिलपासून तालुक्यात आजअखेर २०० टँकरद्वारे ३५ गावांना २़५ लाख लिटर पिण्याचे पाणी मोफत पुरविण्यात आले आहे. 

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, बार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले आहे. पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज सुमारे २० खेपा करून २़५ लाख लिटर पाणी ग्रामीण भागातील जनतेला देण्यात येत आहे. लोकवर्गणीतून देणगीदारांनी दिलेल्या आर्थिक मदतीसह शहरातील काही दानशूर व्यक्तींंनी आपल्या बोअरमधून मोफत पाणी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यात बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, उद्योजक चंद्रकांत सोनिग्रा, शेतकरी नितीन ताटे व व्यापारी सतीश जाजू यांनी या उपक्रमाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. 

हा उपक्रम यशस्वीतेसाठी समितीचे प्रदीप बागमार, अजित कुंकूलोळ, धन्यकुमार शहा, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, गोविंद बाफणा, पवन श्रीश्रीमाळ, राजन कोठारी, भरत वखारिया, पारस कांकरिया व समिती सदस्य परिश्रम घेत आहेत़ 

या गावांना मिळाला लाभ
- बार्शी तालुक्यातील सौंदरे, घाणेगाव, शेंद्री, तांदुळवाडी, बोरगाव झाडी, मांडेगाव, कदमवस्ती, कुसळंब, धानोरे, ढेंबरेवाडी,इर्ले, भोर्इंजे, सुर्डी, दडशिंगे, कांदलगाव, पिंपरी, नारेवाडी, हिंगणगाव, धसपिंपळगाव, कळंबवाडी, गोरमाळे, बोरगाव, भोयरे, फपाळवाडी, साकत, तावडी, खामगाव, नारी आदी गावांना मोफत पिण्याचे पाणी एक दिवसाआड टँकरद्वारे पुरविण्यात आले आहे. यापूर्वी २०१६ मध्येही सुमारे १६०० टँकरच्या खेपा करून बार्शी तालुक्यातील गावांना सकल जैन समाजाने महावीर जन्मकल्याण समितीच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळी परिस्थितीत नेहमीच बार्शी ग्रामीण भागात सकल जैन समाजाने पिण्याचे पाणी पुरवले आहे.

टँकरसाठी मदतीचा ओघ..
- सकल जैन समाज बार्शीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पाणी टँकर योजनेसाठी मुंबई येथील सांताकू्रझ जैन ट्रस्टनेदेखील १२० टँकरसाठी निधी दिला आहे. पारगाव (बीड) चे अजित ताराचंदजी डुंगरवाल यांनी ५१ टँकरसाठी निधी दिला आहे. स्व.कमलबाई भंवरीलालजी फुलफगर परिवार ( घोडनदी) यांनी २१ टँकरसाठी निधी दिला आहे. तसेच बार्शीच्या सुभाषनगरस्थित हॅपी मॉर्निंग ग्रुपने २१ टँकरसाठी निधी दिला आहे.

Web Title: 2.5 lakh liters water provided to 35 scarcity-hit villages through 200 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.