२४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Published: May 14, 2016 03:05 AM2016-05-14T03:05:59+5:302016-05-14T03:05:59+5:30

राज्यातील २४ तुरुंगाधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. कारागृहाचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत

24 Jail Transfers | २४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या

२४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

पुणे : राज्यातील २४ तुरुंगाधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. कारागृहाचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
बदल्या झालेल्या तुरूंगाधिकाऱ्यांची नावे (कोठून कोठे ) : श्रीकृष्ण भुसारे (यवतमाळ जिल्हा कारागृह ते किशोर सुधारालय, नाशिक), दिगंबर इगवे (पैठण खुले जिल्हा कारागृह ते सोलापूर जिल्हा कारागृह), धनसिंग कवाळे (बीड जिल्हा कारागृह ते जालना जिल्हा कारागृह), विलास साबळे (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ते औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह), पांडुरंग भुसारे (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ते अलिबाग जिल्हा कारागृह), मंगेश जगताप (नाशिकरोड मध्यवर्ती ते यवतमाळ जिल्हा कारागृह), सचिन साळवे (धुळे जिल्हा कारागृह ते पैठण खुले जिल्हा कारागृह), भानुदास श्रीराव (जळगाव जिल्हा ते धुळे जिल्हा कारागृह), हरिश्चंद्र जाधवर (मुंबई मध्यवर्ती ते कोल्हापूर मध्यवर्ती), युवराज बावीसकर (मुंबई मध्यवर्ती ते कल्याण जिल्हा), कुंदा जांभुळकर (ठाणे मध्यवर्ती ते कल्याण जिल्हा कारागृह), विलास कापडे (कल्याण जिल्हा ते ठाणे मध्यवर्ती), मुरलीधर अवघडे (कल्याण जिल्हा ते सातारा जिल्हा कारागृह), उमरासिंग पाटील (भायखळा जिल्हा ते मुंबई मध्यवर्ती कारागृह), तानाजी घरबुडवे (कल्याण जिल्हा ते भायखळा जिल्हा कारागृह), गजानन सरोदे (येरवडा मध्यवर्ती ते दौ. जा. तु. अ. प्र. म. येरवडा), पल्लवी कदम (येरवडा मध्यवर्ती कारागृह ते नाशिकरोड मध्यवर्ती), सुशील कुंभार (कोल्हापूर मध्यवर्ती ते सांगली जिल्हा), यशवंत फड (सोलापूर जिल्हा ते नाशिकरोड मध्यवर्ती), महादेव पवार (सांगली जिल्हा ते बीड जिल्हा कारागृह), नितीन क्षीरसागर (अमरावती मध्यवर्ती ते येरवडा मध्यवर्ती), हरिदास कुंटे (अमरावती मध्यवर्ती ते नाशिकरोड मध्यवर्ती) आणि अशोक जाधव (चंद्रपूर जिल्हा ते अमरावती मध्यवर्ती कारागृह). (प्रतिनिधी)

Web Title: 24 Jail Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.