एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:35 AM2019-07-01T05:35:58+5:302019-07-01T08:44:46+5:30

नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील.

1200 state-of-the-art buses to provide ST services to Warkaris will also provide basic amenities | एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

Next

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी होणारी वारक-यांची गर्दी लक्षात घेता, एसटी महामंडळाने नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे ३ हजार ७२४ जादा गाड्या सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. यापैकी १ हजार २०० गाड्या अत्याधुनिक सोईसुविधानियुक्त आणि नव्या बांधणीच्या असतील. त्यामुळे वारक-यांना आरामदायी प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.

नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील. यासाठी विशिष्ट अंतरावर दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत, शिवाय एसटीने सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिका-यांची १० जुलै ते १६ जुलैपर्यंत पंढरपूर येथे नेमणूक केली आहे, तसेच यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्रातून येणा-या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभागनिहाय तात्पुरत्या बस स्थानकांची निर्मिती केली आहे.

प्रवासादरम्यान बस स्थानकांवर उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: 1200 state-of-the-art buses to provide ST services to Warkaris will also provide basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.