‘एका तरुणीच्या नादात एवढं बदनाम केलंय की…’ असं म्हणत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:13 AM2024-02-05T10:13:48+5:302024-02-05T10:14:02+5:30

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे

The young man took an extreme step by saying, 'I have defamed the voice of a young woman so much that...' | ‘एका तरुणीच्या नादात एवढं बदनाम केलंय की…’ असं म्हणत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल   

‘एका तरुणीच्या नादात एवढं बदनाम केलंय की…’ असं म्हणत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल   

मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील लालाखेडी कुल्मी गावातील २३ वर्षांच्या एका तरुणाने सल्फासच्या गोळ्या खाऊन जीवन संपवलं आहे. या तरुणाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी दोन वेगवेगळे व्हिडीओ तयार केले असून, त्यामध्ये आत्महत्या करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. या तरुणाने जीवन संपवण्यापूर्वी हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा तरुण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय होता. तसेच तो आजोळी राहायचा. 

याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाबूलाल डाबी यांनी सांगितले की, लालखेडी कुल्मी गावात एका २३ वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची खबर मिळाली होती. पोलीस रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्या तरुणाचं नाव अंकित असल्याचे समजले. त्याने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करून तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला. अंकितने सल्फासच्या गोळ्या खातानाचा  व्हिडीओ बनवला होता. तसेच तो सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्याने दोन व्हिडीओ बनवले होते. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्याने मृत्यूचं कारणही सांगितलं आहे.

मृतांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, तो गावातील एका तरुणाच्या बहिणीबरोबर दोनवेळा बोलला होता. त्यानंतर या तरुणीचा भाऊ अल्ताफ याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या व्हिडीओमध्ये तो एका जंगलात दिसत आहे. त्याने तेथील झाडाखाली बसून सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या. या तरुणाने विषप्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ हे त्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला मृत घोषित केले. आता या प्रकरणी पोलिसांनी अल्ताफ शाह नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मृत तरुण सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. त्याने अनेक रिल्स बनवून आपल्या सोशस मीडिया अकाऊंटवर अपलोड केले आहेत. तसेच मृत तरुण भूतिया तलाव गावातील रहिवासी होता.  

Web Title: The young man took an extreme step by saying, 'I have defamed the voice of a young woman so much that...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.