वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:47 AM2024-05-06T05:47:27+5:302024-05-06T05:47:32+5:30

वाहन धडकल्यानंतर पलटी झाले. ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे

ASI crushed by sand mafia; Death occurred due to wearing a tractor on the body | वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 

वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 

शहडोल : बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालत एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाला (एएसआय) चिरडल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने ट्रॅक्टर मालकाचे अवैध घर जमीनदोस्त केले.

पोलीस अधीक्षक कुमार प्रतिक यांनी सांगितले की, शनिवारी रात्री  शहडोलचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र बागरी, हवालदार प्रसाद कनोजी आणि हवालदार संजय दुबे परिसरातील बेकायदेशीर वाळू वाहतूक तपासण्यासाठी घटनास्थळी गेले होते. यावेळी एका भरधाव ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता, ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र बागरी यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन धडकल्यानंतर पलटी झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर ट्रॅक्टरचा मालक फरार आहे. ट्रॅक्टरचा मालक सुरेंद्र सिंग याची माहिती देणाऱ्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

रुग्णालयाचा निष्काळजीपणा
nया प्रकरणात सरकारी 
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला. बागरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम खोलीत जमिनीवर ठेवून करण्यात आले. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही अशीच घटना : याआधी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सोन नदीतून अवैध उत्खननातून वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले होते.

Web Title: ASI crushed by sand mafia; Death occurred due to wearing a tractor on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.