लेक्चर कॅन्सल झाल्याच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:41 AM2018-03-13T02:41:13+5:302018-03-13T02:41:13+5:30

माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये मी शिकले. इतर कॉलेजच्या तुलनेत तरुणाईत माझ्या कॉलेजची क्रेझ खूप पाहायला मिळते.

There is nothing bigger than enjoying lectures | लेक्चर कॅन्सल झाल्याच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही

लेक्चर कॅन्सल झाल्याच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही

Next

अपूर्वा परांजपे, अभिनेत्री
कॉलेजविषयी काय सांगशील?
माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये मी शिकले. इतर कॉलेजच्या तुलनेत तरुणाईत माझ्या कॉलेजची क्रे झ खूप पाहायला मिळते. कॅम्पसपासून क्लासरूमपर्यंत प्रत्येक गोष्टीची वेगळी ओळख आहे. कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मला बरंच काही शिकायला मिळालं.
ते दिवस कसे होते?
कधीच विसरता येणार नाहीत, असे हे दिवस आहेत. माझे बीएमएमचे शेवटचे सेमिस्टर बाकी आहे, पण कॉलेज संपल्यानंतर खूप मिस करेन. लेक्चर कॅन्सल झाल्याचा आनंद निदान आता तरी दुसºया कोणत्याही आनंदापेक्षा मोठा नसतो. प्रोजेक्ट देण्याची डेडलाइन म्हणजे मोठे टेन्शन, या दिवसांची आठवण नेहमी येत राहील.
फ्रेंड्स ग्रुप कसा होता?
सध्या कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे फ्रें ड्सशी भेटणं, बोलणं होतं, पण मध्यंतरी माझं मेमरी कार्ड चेक करताना, फर्स्ट ईअरपासूनच्या फ्रेंड्सची, इव्हेंट्सची, पिकनिकची माहिती आणि फोटो सापडले. काही वेळ का होईना, मी पुन्हा भूतकाळात रमले.
नाटक-सीरियलमध्ये एंट्री कशी झाली?
मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे बालकलाकार म्हणून मी काम करायला लागले, पण रुईयामध्ये आल्यावर मी आणखी मनापासून अभिनयाचा विचार करू लागले. या कॉलेजमधून पासआउट झालेल्या अनेक मोठ्या कलाकारांची मनोगते वाचल्याने मला एक नवी प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी माझ्या कॉलेजची नेहमी ऋणी राहीन.
शिक्षकांविषयी काय सांगशील?
नुकताच रिलीज झालेल्या ‘मेमरी कार्ड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी मी बरेच दिवस बाहेर राहिल्याने, अभ्यासात पडलेला गॅप भरून काढण्यासाठी सगळ्याच शिक्षकांनी खूप मदत केली. प्रोजेक्ट सबमिशनच्या तारखा सांभाळून घेतल्या. माझ्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
(मुलाखत - भक्ती सोमण)
>लेक्चर बंक करून मजा करता का?
आम्ही सगळेच कॉलेजच्या इतके प्रेमात आहोत की, लेक्चर बंक करूनसुद्धा कॉलेजमध्येच थांबतो. फेस्टचं काम, प्रॉजेक्ट एडिटिंग अशी कारणं सांगून क्लासरूममधून पळ काढला, तरी कॉलेजच्या बाहेर पाय टाकताना आपण सासरी जातोय की काय, अशीच फिलिंग येते. शेवटी रोज सायंकाळी कॉलेजचे वॉचमॅन आमची पाठवणी करतात.

Web Title: There is nothing bigger than enjoying lectures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.