उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण

By admin | Published: January 19, 2017 05:58 PM2017-01-19T17:58:21+5:302017-01-19T17:58:21+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने एका डॉक्टरला

Woman dies during treatment; Doctor suffers | उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 19 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने एका  डॉक्टरला नातेवाईकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. याबाबत ‘मार्ड’च्या पदाधिका-यांनी गुरुवारी अधिष्ठातांची भेट घेऊन संबंधित नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात लातूर येथील संत गोरोबा नगरातील पूनम कांबळे यांना १६ जानेवारी रोजी सकाळी झटका येत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्या गरोदर असल्याने सिझर करण्यात आले होते. गरोदरपणात झटका येत असल्याने सिझरचीही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केली. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावत गेली. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकाने अतिदक्षता विभागात ड्युटीवर असलेल्या आंतरवासिता डॉ. समीर गहाने यांना मारहाण केली. उपस्थित कर्मचाºयांनी सोडवासोडवी केल्यानंतर प्रकरण मिटले. 
झटके येत असल्यामुळे उपचार... 
१६ जानेवारी रोजी सदर महिलेला झटका येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. वॉर्डमध्ये आणल्यानंतरही झटका आला होता. गरोदरपणात झटका आल्यानंतर पहिल्यांदा शस्त्रक्रिया करून डिलिव्हरी करणे गरजेचे असते. ती डॉक्टरांनी केली होती. मात्र त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे उपचार करणारे डॉ. स्वप्नील यांनी सांगितले. 
पोलिसांत तक्रार... 
मार्डच्या डॉक्टरांनी अधिष्ठातांची भेट घेऊन मारहाण झाल्याचा निषेध करीत संबंधित नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉ. गोविंद खोसे, डॉ. प्रवीण कुमार, डॉ. अनिकेत शेटे, डॉ. प्राजक्ता शेळके, डॉ. रविशंकर पाटील, डॉ. सिद्धेश्वर लाखे, डॉ. प्रवीण सोनुले, डॉ. अनिल अढाव, डॉ. अजय पाचरणे आदींनी अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांची भेट घेऊन गांधी चौक पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: Woman dies during treatment; Doctor suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.