हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह

By राजकुमार जोंधळे | Published: March 20, 2024 05:33 PM2024-03-20T17:33:04+5:302024-03-20T17:34:14+5:30

धक्कादायक! चिमुकल्या मुलीसह पित्याने घरातच संपवले जीवन

The hotelier took the extreme decision of bringing the girl home from school; death bodies were found in home | हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह

हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह

लातूर : सहा वर्षीय मुलीसह पित्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूर शहरातील मोती नगर भागात बुधवारी सकाळी ११:३० वाजण्यापूर्वी घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेल्या अभय लक्ष्मीनिवास भुतडा (वय ३५) यांचा हॉटेल व्यावसाय आहे. त्यांची सहा वर्षाची चिमुकली नवव्या ही सकाळी शाळेत गेली होती. वडील अभय याने आपल्या मुलीला शाळेतून घरी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास आणले. दरम्यान, त्यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. जवळच्या नातेवाईकांनी अभय भुतडा यांना फोन केला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. नातेवाईकांनी तातडीने मोती नगरातील घरी भेट दिली असता, सहा वर्षीय नवव्या आणि अभय भुतडा यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गांधी चौक ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नातेवाईकाच्या माहितीवरून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिस पथकाकडून घटनेच्या कारणांचा शोध...
घरात कोणीच नसल्याचे पाहून, मुलीला शाळेतुन बोलावून घेत अभय भुतडा यांनी मुलीसह आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा वेगवेगळ्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपासातून उलगडा होणार आहे. 
 - अशोक उजगरे, सहायक पोलिस निरीक्षक, लातूर

Web Title: The hotelier took the extreme decision of bringing the girl home from school; death bodies were found in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.