शेतकऱ्यांना कर्ज न देणा-या बँकांवर गुन्हे दाखल करू- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:18 AM2018-06-18T05:18:14+5:302018-06-18T05:18:14+5:30

ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला.

To file criminal cases against non-loanee banks - Sudhir Mungantiwar | शेतकऱ्यांना कर्ज न देणा-या बँकांवर गुन्हे दाखल करू- सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांना कर्ज न देणा-या बँकांवर गुन्हे दाखल करू- सुधीर मुनगंटीवार

Next

लातूर : ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला. शेतक-यांना पतपुरवठा करताना काही राजकीय भावना ठेवली आहे का, हे तपासण्याची आवश्यकता आहे़ सहकार विभाग कृषी पतपुरवठ्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे़ राष्ट्रीयकृत बँकांतून पतपुरवठा चांगला व्हावा, यासाठी लक्ष दिले जात आहे़ जर पतपुरवठा होत नसेल तर राष्ट्रीयकृत बँकांवर गुन्हा दाखल करू असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम सुरु आहे़ परंतु, ही वृक्ष लागवड २८ विभागाअंतर्गत आणि सामाजिक संस्थामार्फत होत आहे़ वृक्ष विकत घेऊन ही लागवड करावी़ ही लोकचळवळ व्हावी, असेही मुनगंटीवार म्हणाले.
राज्यात साडेबारा कोटी मोबाईल, साडेसात कोटी स्मार्टफोन आहेत़ दोन तास व्हॉटस्अ‍ॅपवर खर्च करता त्यासाठी वार्षिक ४३ हजार ८०० कोटी रुपये खर्च होतात़ मग प्राणवायू आणि आयुष्यासाठी ४२ कोटींची झाडे का नकोत, असा सवाल करीत एखादे वृक्ष लावा आणि त्याचे संवर्धन करायची जबाबदारी घ्या, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत़ त्यांची नाराजी ही जनतेच्या प्रश्नांसंदर्भात असू शकते़ ते स्वत:साठी माझ्यावर अन्याय झालाय असे कधीच म्हणत नाहीत़ तसेच छगन भुजबळ यांचा सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहे़
राजकारणात शत्रुत्व नसते, एकमेकांशी भेटणे यावरून पक्ष बदलाचा अर्थ नको, असे एका प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले.


मराठवाड्याला न्याय मिळाला तरच विदर्भ खूश
मराठवाडा माझी सासरवाडी आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून मराठवाड्याला जितका न्याय देता येईल, तितका न्याय देण्याचा सदैव प्रयत्न राहतो. किंबहुना मराठवाड्याला न्याय मिळाला तरच विदर्भ खूश राहतो,अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: To file criminal cases against non-loanee banks - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.