हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भूकंप; लातूरला जाणवला सौम्य धक्का

By संदीप शिंदे | Published: March 21, 2024 09:21 AM2024-03-21T09:21:23+5:302024-03-21T09:21:42+5:30

वारांगा फाटा - आखाडा बाळापूर दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू

Earthquake in Hingoli, Nanded District; Latur felt a mild shock | हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भूकंप; लातूरला जाणवला सौम्य धक्का

हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भूकंप; लातूरला जाणवला सौम्य धक्का

लातूर : हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, वारांगा फाटा याठिकाणी गुरुवारी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूगर्भातुन आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. या भूकंपाचालातूर जिल्ह्यात सौम्य धक्का जाणवला आहे.

या धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ४.५ व ३.६ अशी झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. या भूकंपाचा सौम्य धक्का नांदेड, परभणी, लातूर या जिल्हात व परिसरातही जाणवला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Earthquake in Hingoli, Nanded District; Latur felt a mild shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.