ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By संदीप शिंदे | Published: April 25, 2024 06:56 PM2024-04-25T18:56:08+5:302024-04-25T18:56:49+5:30

देवकरा येथील जवान अनिल एकनाथ सुरवसे (वय ३३) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ओडिसा येथे कार्यरत होते.

Accidental death of CISF jawan while approaching village | ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील रहिवाशी व सध्या ओडिसा येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कार्यरत असणारे जवान अनिल एकनाथ सुरवसे स्वतःच्या चारचाकी वाहनाने गावाकडे येत असताना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी तिरुअनंतपूरमजवळ घडली.

देवकरा येथील जवान अनिल एकनाथ सुरवसे (वय ३३) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ओडिसा येथे कार्यरत होते. दीड वर्षांपूर्वी पुणे येथून त्यांची बदली ओडिसा येथे झाली होती. गावात सप्ताहाचा कार्यक्रम सुरू असल्याने ते पत्नी व तीन वर्षाच्या मुलासह ओडिसावरून तिरुअनंतपूरममार्गे गावाकडे येत होते. दरम्यान, तिरूअनंतपूरमजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. तर पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहे तर मुलगाही जखमी झाला आहे. मृत जवान अनिल सुरवसे यांच्यावर गुरुवारी सकाळी देवकरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Accidental death of CISF jawan while approaching village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.