Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: August 12, 2022 11:39 PM2022-08-12T23:39:45+5:302022-08-12T23:41:21+5:30

Accident: उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरात वास्तव्याला असलेल्या पिता-पुत्राचा बीदर येथून उदगीरकडे येताना कर्नाटक बस आणि कारचा समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात कारमधील पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

Accident: Car-bus collided near the end; Father and son of Udgir died on the spot, three injured | Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

googlenewsNext

- राजकुमार जोंधळे
लातूर - उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरात वास्तव्याला असलेल्या पिता-पुत्राचा बीदर येथून उदगीरकडे येताना कर्नाटक बस आणि कारचा समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात कारमधील पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, उदगीर शहरातील चौबारा परिसरात असलेल्या औरंगपुरा भागात गवंडी गल्लीमध्ये राहणारे हाशमी सय्यद मुखीम इकबालसाब हे शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथून कारने (टी.एस. ०९ एफ.ए. ३३५६) उदगीरच्या दिशने निघाले हाेते. दरम्यान, त्यांची कार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बीदरनजीक उदगीर मार्गावर आले असता समोरून येणाऱ्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस (के.ए. ३८ एफ. १२५१) आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील हाशमी सय्यद इकबालसाब (वय ६८) आणि त्यांचे पुत्र हाशमी सय्यद मुखीम इकबालसाब (वय ४०) हे दोघे पिता-पूत्र जागीच ठार झाले. कारमधील अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती उदगीर येथील नातेवाईकांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले.

उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह बीदर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दाेघे जागीच ठार झाले आहे.

Web Title: Accident: Car-bus collided near the end; Father and son of Udgir died on the spot, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.