लातुरात कौटुंबिक वादातून पोलिसाचा पत्नीवर ब्लेडने वार

By राजकुमार जोंधळे | Published: July 26, 2023 06:27 PM2023-07-26T18:27:00+5:302023-07-26T18:27:11+5:30

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A policeman stabbed his wife with a blade due to a family dispute in Latur | लातुरात कौटुंबिक वादातून पोलिसाचा पत्नीवर ब्लेडने वार

लातुरात कौटुंबिक वादातून पोलिसाचा पत्नीवर ब्लेडने वार

googlenewsNext

लातूर : मुलाच्या वसतिगृहावर बोलावून एका पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर दाढी करण्याच्या ब्लेडने वार केल्याची घटना लातुरातील राजीव गांधी चौक परिसरात मंगळवारी रात्री घडली. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांने आपल्या पत्नीला औसा रोडवरील राजीव गांधी चौकातील मुलांच्या एका वसतिगृहात फोन करून बोलावून घेतले. दरम्यान, तू येथे कशी काय? अशी विचारणा केली. तू येथे काय करतेस? असे म्हटल्यावर पत्नीने तुम्हीच फोन करून बोलावून घेतले म्हणून येथे आले, असे उत्तर दिले. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत केस ओढून, लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, हातात असलेल्या दाढी करण्याच्या ब्लेडने पत्नीला मार लागला. यामध्ये ती जखमी झाली आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबनुसार पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: A policeman stabbed his wife with a blade due to a family dispute in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.