डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु

By राजकुमार जोंधळे | Published: February 8, 2023 08:16 PM2023-02-08T20:16:45+5:302023-02-08T20:17:16+5:30

लातूरमध्ये नांदेड महामार्गावर असलेल्या भातखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली.  

 A 25-year-old youth from Bhatkheda on Nanded highway in Latur was shot dead in the head by unknown assailants  | डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु

डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु

googlenewsNext

लातूर : शहरालगत नांदेड महामार्गावर असलेल्या भातखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, भातखेडा येथील आपल्या आजारी असलेल्या वडिलांसोबत सुरज गोविंदराव मुळे (वय २५) हा सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास झोपी गेला होता. दरम्यान, रात्री अज्ञात मारेकऱ्यांकडून सुरज मुळे याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात डॉक्टरांच्या माहितीवरून प्रारंभी मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अधिक तपासात हा खून असल्याचे समोर आले. अज्ञात मारेकऱ्यांकडून मयत सुरज मुळे याच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली असून, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३०२ भदवी प्रमाणे बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे करत आहेत.

तपासानंतर खरे कारण येईल समोर 
सुरज मुळे या तरुणाची कोणासोबत भांडणतंटा होता का? पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला का? मालमत्तेसह इतर कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. सध्याला कारण समोर आले नसले तरी, तपसानंतर वास्तव कारण समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पाळत ठेवून आरोपींनी सुरजवर झाडली गोळी 
अज्ञात मारेकऱ्यांनी सुरज मुळे याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली असावी. त्यानंतरच हत्येचा कट रचला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो गावाकडे मुक्कामी आल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. 

महिन्यात घडल्या चार खुनाच्या घटना
लातूर शहरालगत असलेल्या वासनगाव, बोरी, बाभळगाव आणि आता भातखेडा येथे महिनाभरात अत्यंत निर्घृण खून करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. यातील बोरी नदीपात्रात दगडाने ठेचून खून करत मृतदेह मांजरा नदीपात्रात टाकला होता. त्यातील आरोपी सापडला आहे. वासनगाव  येथेही एका महिलेचा दगडानेच ठेचून खून केल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी सापडला आहे. मात्र, बाभळगाव येथील खुनाचा अद्याप उलगडा झाला नाही.

 

 

Web Title:  A 25-year-old youth from Bhatkheda on Nanded highway in Latur was shot dead in the head by unknown assailants 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.