कळंबा सुशोभीकरणाचे काम ठप्प: पाठपुराव्याची गरज , दोन कोटी २५ लाखांचा निधी अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:53 AM2017-12-08T00:53:04+5:302017-12-08T00:53:30+5:30

कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे

Work of beautification of the kindergarten: The need for follow-up, funding of two crore and 25 lakhs is stuck | कळंबा सुशोभीकरणाचे काम ठप्प: पाठपुराव्याची गरज , दोन कोटी २५ लाखांचा निधी अडकला

कळंबा सुशोभीकरणाचे काम ठप्प: पाठपुराव्याची गरज , दोन कोटी २५ लाखांचा निधी अडकला

googlenewsNext

अमर पाटील ।
कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे १० कोटी रुपयांचे काम गेले दोन महिने बंद आहे. पहिल्या टप्प्यातील मिळालेल्या ७ कोटी ७५ लाखांच्या मंजूर निधीतून जनावरे धुण्याचा हौद, अडीच कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, बंधारा पिचिंग इतकीच कामे झाली असून, यावर अंदाजे ७ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

सुशोभीकरणाच्या १० कोटींच्या निधीपैकी ७ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर होऊन विविध विकासकामांवर खर्ची पडला. आता उर्वरित दोन कोटी २५ लाखांच्या निधीसाठी निविदाधारक कंपनीस मिळणारा निधी व त्यातून होणारी सुशोभीकरणाची विकासकामे याचा स्वतंत्र प्रस्ताव पालिकेस सादर करावा लागेल. पालिका हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सादर करेल. प्राधिकरणची मंजुरी मिळताच हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीसाठी जाईल.

या विभागाची मंजुरी मिळताच उर्वरित २ कोटी २५ लाखांचा निधी महापालिकेकडे वर्ग होईल. त्यानंतर उर्वरित सुशोभीकरणाच्या कामास मुहूर्त लागेल.पहिल्या टप्प्यातील मंजूर निधीतील प्रत्यक्षात निविदेतील कामे व झालेली विकासकामे यात तफावत असून, बंधारा पिचिंग व बंधारा पदपथ सुमार दर्जाचा झाला आहे. पालिका आयुक्तांनी या कामाची झाडाझडती घेतली. पिचिंगचे काम पुन्हा करण्यास सांगितले. त्याच्या एक वर्षानंतर दर्जा बघून बिल अदा करण्याच्या सूचना केल्या. सध्या तलाव भरला असल्याने हे काम करता येत नाही. तर उर्वरित कामासाठी निधी नाही. शिल्लक निधी मिळेनासा झाल्याने गेले दोन महिने काम बंद आहे.

दहा कोटींचे सुशोभीकरण अंधारात
तलावावर बंधारा पिचिंग, प्रवेशद्वार व जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण ही कामे झाली असली तरी पथदिवे नसल्याने एवढे मोठे सुशोभीकरणाचे काम रात्र होताच एकही दिवा नसल्याने अंधारात गडप होते.

उर्वरित कामे होणार का?
मनोरा दुरुस्ती, अ‍ॅम्पीथिएटर, व्यवस्थापन कार्यालय, स्वच्छतागृहे, मिनी कुस्ती मैदान, पदपथ, पथदिवे, संरक्षक भिंत कामे प्रलंबित आहेत. ७ कोटी ७५ लाखांच्या निधीतील ही कामे आता उर्वरित २ कोटी २५ लाखांच्या निधीत होणार का, हा प्रश्न आहे.

देखभालीविना अवास्तव खर्च
मुळात दहा कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जावर नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने बंधारा पिचिंग प्रवेशद्वार काम दोनदा करावे लागले, तर पालिका मालकीच्या तलावावर देखभालीसाठी एकही कर्मचारी नियुक्त नाही, हे दुर्दैव.

Web Title: Work of beautification of the kindergarten: The need for follow-up, funding of two crore and 25 lakhs is stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.