साखर कारखानदारांच्या बैठकीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:39 PM2018-01-01T22:39:45+5:302018-01-01T22:39:45+5:30

कोल्हापूर : साखर दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साखर कारखानदारांच्या बैठकीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

Uncertainty about the meeting of sugar factories | साखर कारखानदारांच्या बैठकीबाबत अनिश्चितता

साखर कारखानदारांच्या बैठकीबाबत अनिश्चितता

Next

कोल्हापूर : साखर दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साखर कारखानदारांच्या बैठकीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आज, मंगळवारी मुंख्यमंत्री मुंबईत नसल्याने बैठकीबाबत चर्चा झालेली नाही.

घसरलेले साखरेचे दर व उसाची पहिली उचल याचा ताळमेळ घालताना साखर कारखानदारांची दमछाक उडाली आहे. पहिल्या उचलीची कोंडी फोडताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे आता निर्माण झालेला पेच त्यांनीच सोडवावा, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

मंत्री पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्'ातील साखर कारखानदारांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासमवेत मंगळवार किंवा बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले होते.

बैठकीबाबत सरकारच्या पातळीवरून निरोप येईल, याकडे कारखानदारांच्या नजरा लागल्या आहेत; पण आज, सोमवारी मुख्यमंत्रीच मुंबईत नसल्याने बैठक होणार नाही. उद्या, बुधवारी बैठक होणार की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे. दरम्यान, आज राज्य साखर संघाच्या पदाधिकाºयांची बैठक होत आहे. त्यामध्ये साखर दराबाबतही चर्चा होणार असून, तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीचा वार निश्चित होईल, असा अंदाज आहे.

 

 

Web Title: Uncertainty about the meeting of sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.