Lok Sabha Election 2019 उदयसिंगराव गायकवाड यांचे मताधिक्याचे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:39 AM2019-04-16T00:39:30+5:302019-04-16T00:39:47+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९१ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी त्यांचे ...

Uday Singhrao Gaikwad's record of voting remained unchanged for 28 years | Lok Sabha Election 2019 उदयसिंगराव गायकवाड यांचे मताधिक्याचे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित

Lok Sabha Election 2019 उदयसिंगराव गायकवाड यांचे मताधिक्याचे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित

googlenewsNext

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९१ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रामचंद्र फाळके यांच्यावर १ लाख ९१ हजार ३३१ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता. १९७१ पासूनच्या निवडणुकीतील हे सर्वाधिक मताधिक्य असून, गेल्या २८ वर्षांत हे रेकॉर्ड अबाधित आहे.
कोल्हापूर मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. शेतकरी कामगार पक्षाचे त्यांना तगडे आव्हान राहिले. सन १९७७ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघावर कॉँग्रेस आणि त्या विचारसरणीचा उमेदवार कमी-अधिक मतांनी विजयी झाला आहे. उदयसिंगराव गायकवाड हे १९८० पासून कॉँग्रेसच्या उमेदवारीवर रिंग्ांणात उतरले. त्यांनी पहिल्याच लढतीत १ लाख ५४ हजार ४४३ इतक्या मताधिक्याने ‘शेकाप’चे दाजीबा देसाई यांचा पराभव केला. तेथून पुढे पाचवेळा त्यांनी ‘कोल्हापूर’चे प्रतिनिधित्व केले. पाच टर्ममध्ये १९९१ मध्ये तब्बल १ लाख ९४ हजार ३३१ इतक्या मताधिक्याने विजयी मिळवला. त्यावेळी गायकवाड यांना ४ लाख ११ हजार ७५ मतांपैकी २ लाख ६९ हजार ५०८ मते मिळाली होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रामचंद्र फाळके यांना ७५ हजार १७७ मते मिळाली होती. गायकवाड यांचे हे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित आहे.

कोणाला किती होते मताधिक्य
वर्ष नाव मताधिक्य
१९७१ राजाराम निंबाळकर १,०७,६६४
१९७७ दाजीबा देसाई १६५
१९८० उदयसिंगराव गायकवाड १,५४,४४३
१९८४ उदयसिंगराव गायकवाड १,४९,४७४
१९८९ उदयसिंगराव गायकवाड ४१,१२८
१९९१ उदयसिंगराव गायकवाड १,९१,३३१
१९९६ उदयसिंगराव गायकवाड ६८,३२५
१९९८ सदाशिवराव मंडलिक ६१,५९८
१९९९ सदाशिवराव मंडलिक १,०८,९१०
२००४ सदाशिवराव मंडलिक १४,७५३
२००९ सदाशिवराव मंडलिक ४४,८००
२०१४ धनंजय महाडिक ३३,२५९
165 एवढ्या कमी मताधिक्याने दाजीबा देसाई यांना १९७७ मध्ये विजय मिळाला होता. १९७७ ला ‘शेकाप’चे देसाई व कॉँग्रेसचे शंकरराव माने यांच्यात लढत झाली. अपक्ष शामराव माळी यांनी २१०९ मते घेतली.

Web Title: Uday Singhrao Gaikwad's record of voting remained unchanged for 28 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.