कोल्हापूर परिक्षेत्रात दिवसाला दोन आत्महत्या: समाजासमोर चिंता--कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५३३ जणांनी जीवनयात्रा संपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:00 AM2017-11-19T01:00:26+5:302017-11-19T01:02:03+5:30

कोल्हापूर : परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत दिवसाला दोन आत्महत्या होतात.

Two suicides per day in Kolhapur ranges: anxiety before society - 533 people completed life term in Kolhapur district | कोल्हापूर परिक्षेत्रात दिवसाला दोन आत्महत्या: समाजासमोर चिंता--कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५३३ जणांनी जीवनयात्रा संपविली

कोल्हापूर परिक्षेत्रात दिवसाला दोन आत्महत्या: समाजासमोर चिंता--कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५३३ जणांनी जीवनयात्रा संपविली

Next
ठळक मुद्दे संकटाला धैर्याने सामोरे न जाता आत्महत्या करून जीवन संंपविण्याकडे वाढता कल कुटुंबाचा विचार न करता विष किंवा गळफास घेऊन मोकळे होतात आजकालचे पालक मुलांना समजावयाला किंवा बोलायला घाबरतात,

एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत दिवसाला दोन आत्महत्या होतात. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ५३३ आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करणाºयांत तरुणांची संख्या जास्त असून, ही बाब चिंताजनक आहे. संकटाला धैर्याने सामोरे न जाता आत्महत्या करून जीवन संंपविण्याकडे वाढता कल आहे. गेल्या दोन वर्षांतील परिक्षेत्रातील आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये वाढ झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

आजकाल सोशल मीडियामुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एक वेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात ते धन्यता मानतात आणि त्यातूनच मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात.

उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. कर्जबाजारी झालेल्या काही शेतकºयांना स्वत:चे जीवन स्वस्त झाले आहे. कुटुंबाचा विचार न करता विष किंवा गळफास घेऊन मोकळे होतात. त्यांच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. आजही ज्या घरातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे, त्या कुटुंबातील लोक स्वत:ला सावरू शकलेले नाहीत.

नवविवाहितांची मानसिकता
नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा, त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. पतीकडून भ्रमनिरास झालेला असतो. माहेरी परत जावे तर आपल्याला स्वीकारणार नाहीत किंवा वडिलांची अब्रू जाईल, अशा कोंडीत सापडलेल्या नवविवाहिता मरणाला जवळ करतात.

मुलांमधील न्यूनगंड
मराठी शाळेत शिकणाºया लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुलं किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करत आहेत. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजावयाला किंवा बोलायला घाबरतात, त्यामुळे हीएक मोठी समस्या बनत चाललीआहे.

परिक्षेत्रातील आकस्मिक मृतांची जिल्हावार नोंद
कोल्हापूर : १०४५
सांगली : १२६३
सातारा : ११९५
सोलापूर ग्रामीण : १५२४
पुणे ग्रामीण : ५५१३

पैसा मिळविण्यासाठी काहीही करण्याची मानसिकता तरुण पिढीमध्ये आहे. त्यामध्ये ते अपयशी ठरले तर नैराश्य येते आणि त्यातून ते आत्महत्या करतात. त्यांचे हट्ट पुरविले जातात आणि मग ते स्वत:ला हिरो समजतात. ज्यावेळी त्यांची भावना दुखावली जाते, त्यावेळी ते स्वत:ला सावरू शकत नाहीत. त्यातून ते जीवन संपवितात. पालकांनी सुरुवातीपासून काही गोष्टी आपणाला शक्य नाहीत, याची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे.
- डॉ. सुभदा दिवाण, समुपदेशक, कोल्हापूर

‘आत्महत्या’ हे काय समस्येवर उत्तर नाही. नैराश्य आलेल्या व्यक्तींनी त्या समस्येकडे संधी म्हणून पाहिले तर अनेक उत्तरे मिळतात. विचार करण्याची क्षमता वाढते. ही सकारात्मक वृत्ती ठेवल्यास आपोआप नैराश्येतून बाहेर पडू शकतो.
- डॉ. प्रशांत अमृतकर , कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक

 

जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येमुळे सगळे प्रश्न
सुटतात असे नाही, तर ते वाढतात आणि अधिक गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास सहन करावा
द्यलागतो.
- अजित मोहिते,   ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूर
 

Web Title: Two suicides per day in Kolhapur ranges: anxiety before society - 533 people completed life term in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.