‘किक आॅफ’ आजपासून के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा :

By admin | Published: November 18, 2014 01:08 AM2014-11-18T01:08:24+5:302014-11-18T01:09:02+5:30

पहिली लढत संध्यामठ विरुद्ध प्रॅक्टिस (ब)

From today's 'kick of' S. A. League football tournament: | ‘किक आॅफ’ आजपासून के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा :

‘किक आॅफ’ आजपासून के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा :

Next

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात मानाची समजली जाणाऱ्या ‘केएसए फुटबॉल लीग’ स्पर्धेला उद्या, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. याचबरोबर २०१४-१५ या नव्या फुटबॉल हंगामासही सुरुवात होत आहे. सलामीचा सामना छत्रपती शाहू स्टेडियम येथे संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) यांच्यातील लढतीने होणार आहे.
गेल्यावर्षी प्रॅक्टिस (ब) आणि साईनाथ हे संघ वरिष्ठ गटात आले. क्रमवारीनुसार पहिल्या सुपर आठ आणि त्यानंतरच्या आठ अशा संघांची क्रमवारी या स्पर्धेतून जाहीर होते. ज्यांचे क्रमवारीतील गुण सर्वांत कमी त्यानुसार त्या संघांना कनिष्ठ गटात पुन्हा खेळावे लागते.
यंदा क्रमवारीत पहिल्या सुपर आठमध्ये स्थान मिळविण्यासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. कारण यंदा सोळा संघांनी प्रथमच परदेशी खेळाडूंना बाहेरची वाट दाखविली आहे. त्यामुळे संपूर्ण हंगाम देशी खेळाडूंच्या खेळावरच आहे. त्यामुळे क्रमवारीत अग्रस्थान राखण्यासाठी प्रत्येक खेळाडूंचा कस या स्पर्धेत लागणार आहे. पहिल्याच दिवशी संध्यामठ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यात पहिला सामना दुपारी दोन वाजता होणार आहे, तर दुसरा सामना याच दिवशी दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुद्ध प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यात होणार आहे.

.स्पर्धेत एकूण ५६ सामने


४स्पर्धेत एकूण ५६ सामने होणार आहेत.
४यामध्ये गुणांवर विजेतेपद ठरत असल्याने जास्तीत जास्त सामने जिंकण्याकडे पी.टी.एम. (अ) व (ब), प्रॅक्टिस (अ) व (ब), खंडोबा, फुलेवाडी, उत्तरेश्वर, संध्यामठ, दिलबहार (अ) व (ब), शिवनेरी, कोल्हापूर पोलीस संघ, बालगोपाल, शिवाजी, साईनाथ, पॅट्रियट या सर्व संघांच्या व्यवस्थापनाने जादा मेहनत घेतली आहे.
४यंदा आम्हीच जिंकणार, असा प्रत्येक संघाचा दावा आहे.
४ त्यामुळे उद्यापासून सुरूहोणाऱ्या फुटबॉल हंगामात कोणता संघ संपूर्ण हंगामात सरस ठरतो. याकडे सर्व क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: From today's 'kick of' S. A. League football tournament:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.