निपाणीजवळील अपघातात कोल्हापूरच्या दोन वकिलांसह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 07:06 PM2017-09-04T19:06:29+5:302017-09-04T19:06:34+5:30

 Three deaths along with two advocates of Kolhapur in collision near Nippani | निपाणीजवळील अपघातात कोल्हापूरच्या दोन वकिलांसह तिघांचा मृत्यू

निपाणीजवळील अपघातात कोल्हापूरच्या दोन वकिलांसह तिघांचा मृत्यू

googlenewsNext

कोल्हापूर, दि. ४ : न्यायालयाचे काम आटपून आजºयाहून कोल्हापुरला येत असताना स्तवनिधी (तवंदी) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील वकील जावेद मुल्ला (वय.४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर) आणि देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे अशील चंद्रकांत श्रीपती पाटील (पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जावेद मुल्ला व अन्य दोन असे आजरा येथे कोर्ट कामासाठी गेले होते. कोल्हापूरकडे येत असताना संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हिटनी गावाजवळत त्यांच्या मोटारीचा अपघात होऊन मुल्ला, वाघमारे आणि पाटील (पन्हाळा) हे जागीच ठार झाले. मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत होते.

Web Title:  Three deaths along with two advocates of Kolhapur in collision near Nippani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.