कर्जमाफीच्या कामाचे ‘टेन्शन’: कोल्हापूर सहायक निबंधक रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:42 AM2017-11-15T00:42:51+5:302017-11-15T00:44:33+5:30

कोल्हापूर : कर्जमाफीचा सर्वाधिक गोंधळ कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून, त्याचा फटका आता त्यामध्ये काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांना बसू लागला आहे

 'Tension' for loan waiver: Kolhapur Assistant Registrar at the hospital | कर्जमाफीच्या कामाचे ‘टेन्शन’: कोल्हापूर सहायक निबंधक रुग्णालयात

कर्जमाफीच्या कामाचे ‘टेन्शन’: कोल्हापूर सहायक निबंधक रुग्णालयात

Next
ठळक मुद्दे रोजच्या नव्या माहितीने अधिकारी अस्वस्थवरिष्ठ पातळीवरून कमालीचा दबाव वाढला

कोल्हापूर : कर्जमाफीचा सर्वाधिक गोंधळ कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून, त्याचा फटका आता त्यामध्ये काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांना बसू लागला आहे. बारा-बारा तास याद्या अपलोड करण्याबरोबरच रोज एक नवीनच माहिती मागविली जात असल्याने कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. याच ताणतणावातून मंगळवारी सकाळी सहायक निबंधक अमित गराडे कार्यालयातच चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करताना अधिकाºयांसह सर्वच यंत्रणेची दमछाक उडाली आहे. प्रोत्साहनपर अनुदानासाठी परतफेडीच्या मुदतीवरून तर याद्यांत घोळ निर्माण झाला. त्यातील त्रुटी काढताना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे. त्रुटी दूर केल्या की पुन्हा फाईल मागे येत असल्याने काय करायचे हेच यंत्रणेला समजत नाही. त्यात सर्वांत मागे कोल्हापूर जिल्हा राहिल्याने वरिष्ठ पातळीवरून कमालीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे बारा-बारा तास कर्जमाफीचे काम जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरू आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक अमित गराडे यांच्याकडे कर्जमाफीचे काम होते. सोमवारी दिवसभर त्यांनी कार्यालयात बसून संस्था पदाधिकाºयांची माहिती एकत्रीकरण केले. रात्री साडेदहापर्यंत ते कार्यालयातच होते. सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले, फोनवर बोलत आपल्या खुर्चीकडे जाताना चक्कर आली आणि ते खुर्चीवर कोसळले. त्यांची दातखिळी बसल्याने इतर कर्मचारीही घाबरले, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व इतर अधिकाºयांनी गराडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, अरुण काकडे यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली.

दीड लाख शेतकºयांची माहिती अपलोड
राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याच्या कामाने थोडी गती घेतली असून, मंगळवारअखेर ६७५ विकास संस्थांतर्गत दीड लाख शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात सहकार विभागाला यश आले आहे. संपूर्ण माहिती भरण्यासाठी अजून तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ गेले पंधरा दिवस जिल्हा बँकेत सुरू आहे. याद्यांतील त्रुटी दूर करताना कर्मचाºयांची दमछाक झाली असून, वेळेत माहिती येत नसल्याने सहकार विभागाचा दबाव आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकेतील आयटी विभागाचे १५ अधिकारी येथे आणले आहेत; पण जिल्हा बँकेत पुरेसे संगणक प्रणाली नसल्याने कामास विलंब होत असल्याची तक्रार सहकार विभागाच्या अधिकाºयांनी केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी जिल्हा बँकेने ५३ संगणकांची व्यवस्था केल्याने कामाने थोडी गती घेतली आहे. सोमवारअखेर ९२ हजार शेतकºयांची माहिती भरण्यात आली होती. मंगळवारी या कामाने गती घेतली असून ६७५ विकास संस्थातंर्गत सुमारे दीड लाख शेतकºयांची माहिती भरण्यात आलेली आहे. येत्या तीन दिवसांत संपूर्ण माहिती भरण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे.

खंडागळे, अहिरेनंतर गराडे
कर्जमाफीच्या कामाने अधिकारीवर्ग कमालीचा तणावाखाली काम करत आहे; पण सरकार फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही.कामाच्या तणावामुळे नाशिकचे सहायक निबंधक अहिरे यांचे निधन झाले, तर मंचर (पुणे)चे सहायक निबंधक खंडागळे यांच्यावर अजून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तोपर्यंत अमित गराडे हे चक्कर येऊन पडल्याने खळबळ उडाली आहे.

चावडी वाचनात १०२ अपात्र
गेले दीड महिना जिल्ह्यात कर्जमाफीच्या याद्यांचे गावपातळीवर वाचन सुरू होते. यामध्ये नावांवर हरकती घेतल्याने १०२ शेतकरी अपात्र ठरले.

Web Title:  'Tension' for loan waiver: Kolhapur Assistant Registrar at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.