कोल्हापूर : केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शिवाजी चौकात गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला.


गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना त्यांच्या मनाला येईल तशी दरवाढ करण्यास मान्यता दिली आहे. सर्वसामान्य जनता या दरवाढीमुळे हैराण झाली आहे. ही दरवाढ केंद्र शासनाने त्वरित मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, याकरिता गुरुवारी सकाळी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रदेश प्रतिनिधी सुनीता राऊत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, शीतल तिवडे, रेहाना नागरकट्टी, शारदा चेट्टी, बिल्कीस सय्यद, माई वाडेकर, शमा महात, संध्या भोसले, शशिकला गेंजगे, नजमा शेख, नसीम शेख, अनिता टिपुगडे, माजी महापौर आर. के. पोवार, सुहास साळोखे, लहू शिंदे, फिरोज सरगूर, रियाज कागदी, जयकुमार शिंदे, महादेव पाटील, राजाराम सुतार, आदी उपस्थित होते.