‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

By Admin | Published: May 22, 2017 01:10 AM2017-05-22T01:10:41+5:302017-05-22T01:10:41+5:30

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

'Swabhimani' from today, 'Self-play' padyatra | ‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या ‘आत्मक्लेश’ यात्रेला आज, सोमवारपासून पुण्यातून सुरुवात होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी रविवारी पुण्याकडे रवाना झाले.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा, शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या फुले वाड्यापासून ‘आत्मक्लेश’ यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला आज, सोमवारी सकाळी प्रारंभ होणार आहे. पुणे-खोपोली-पनवेल-वाशी ते मंत्रालय या मार्गावरून
ही यात्रा जाणार असून, तब्बल नऊ दिवस राजू शेट्टींसह हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
रविवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यातील शेतकरी पुण्याकडे रवाना झाले. नवव्या दिवशी, ३० मे रोजी मंत्रालयावर धडक देऊन राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे.
या यात्रेची तयारी गेले महिनाभर राज्यातील गावा-गावांत सुरू आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी ताकदीने घराबाहेर पडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून मोर्चेकऱ्यांसाठी रोज भाकऱ्या पाठविण्याचे नियोजनही केले आहे.


कार्यकर्ते रात्रीच रवाना
स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीचे कार्यकर्ते रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वेने पुण्याला रवाना झाले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.
यात्रेत इचलकरंजीतील नाभिकांची सेवा
शेतकऱ्यांच्या आत्मक्लेश यात्रेला पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्वच घटक सरसावले आहेत. इचलकरंजीमध्ये रविवारी नागरिकांनी वर्गणी काढून खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दिली तर यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इचलकरंजीतील नाभिक समाजही पुढे आला आहे. काय आहेत मागण्या...
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा.
उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या.
शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा.
शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा.
स्वामिनाथन कमिटीचा अहवाल स्वीकारा.

Web Title: 'Swabhimani' from today, 'Self-play' padyatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.